लेखक की और रचनाएं

शेतकर्‍यांचे जिवनमान उंचावणारे पिंगोरीतील जलसंधारण

Source: 
जलसंवाद, मार्च 2017

जलयुक्‍त शिवार अंतर्गत शासनाकडून होणार्‍या कामांची काठेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली शासकीय निधीची गळती थांबवून अधिकाधिक प्रभवी काम करण्यात आली. जलयुक्‍त शिवारच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनीही पिंगोरी गावास भेट देवून जलसंधारणाचे कामाचे कौतुक केले. जलसंधारणाचे कामे करत असतांनाच गावाने रोपवाटीका तयार करुन वृक्षलागवड करण्याची मोहिम सातत्याने राबवली जात आहे.

रोटरी क्लब, श्रीमंत दगडूशेठ हलावाई गणपती ट्रस्ट, शासन व लोकसहभागातून पिंगोंरी गावात प्रभावी जलसंधारणाची कामे करण्यात आली माथा ते पायथा जलसंधारण व मृदुसधारणाचे कार्यकम राबविण्यात आले, सलग समतलचर (सीसीटी), गाळ काढणे, खोलीकरण, सिमेंट बंधारे, शेततळी लुजबोल्डर अशी कामे करण्यात आली पाणी अडवून इथेच न थांबता पाण्याचा नेमका उपयोग करुन कमीपाण्यात अधिक शेती करणे, आधुनिक सिचेनाच्या आधारे पडील क्षेत्र लागवडी खाली आणून शेतकर्‍यांचे जिवनमान उचावण्यासाठीच्या उपायोजना करण्याचे पिंगोरी करांनी श्रीगणेशा केला आहे.

पुण्यापासून 60 कि.मि.अंतरावर पुरंदर तालुक्यातील पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. डोंगर दर्‍यात वसलेल्या या गावात दुष्काळ हा पाचवीला पुजला आहे. दरवर्षी एप्रिल मे महिना आला की पिण्याच्या पाण्याचे दर्भिक्ष्य सुरू होते. स्वाभाविकच उन्हाळयात पिण्यासाठी पाण्याचा टँकरवर अवलंबून रहावे लागते 2012-13 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता पुरदंर तालुका हा पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी पर्जन्यवृष्टी असलेला तालुका. स्वाभाविकच पिंगोरी ही दुष्काळात होरपळतच होती. गावाला सातत्याने भेडसावणार्‍या पाणी टंचाईतून मार्ग कसा काढायाचा याचा विचार ग्रामस्थ करीत होते. गावामध्येच 16 हेक्टर क्षेत्रावर पसरलेला पाझर तलाव आहे. 1970 मध्ये बांधण्यात आलेला हा तलाव दर वर्षी वाहून येणार्‍या गाळामुळे भरला होता.

गाळाने भरल्यामुळे पाणी साठा कमी होत होता. शिवाय त्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरतही नव्हते. ही परिस्थिती बदलण्यासाठी तलावातील गाळ काढणे गरजेचे होते. त्यावेळी जलयुक्त शिवार अथवा इतर कोणत्याही योजना किंवा जागृतीही नव्हती या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांनीच एकत्र येऊन मार्ग काढण्याचे ठरले गावातील एका रस्त्याचे रोजगार हमीतून काम करण्याचे ठरले. ग्रामस्थांनी रोजगार हमीच्या कामावर जाण्यास सुरूवात केली त्यातून येणार्‍या पैशातून गाळ काढण्याचे ठरले प्रत्यक्ष गाळ काढण्यासाठी सुरूवात झाली अशा पध्दतीने इतक्या मोठया तलावातून कितीसा गाळ निघणार अशी शंकाही उपस्थित करण्यात आल्या. तरी ही चांगले काम हाती घेतले आहे यश येईल या भावनेने काम चालू ठेवण्यात आले आणि या भावनेला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीने साद दिली. श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट दुष्काळात आपत्‍ती निवारणाची कामे करणार असल्याचे समजले त्या नंतर ट्रस्ट संपर्क करण्यात आला.

ग्रामस्थाच्या विनंतीला मान देऊन ट्रस्टचे पदाधिकारी पिंगोरी गावात आले त्यांनी ग्रामस्थांची धडपड पाहून तलावातील गाळ काढण्याची तयारी दर्शविली आठवडाभरातच ट्रस्टने तीन पोकलेन 25 डंपर पाठवून कामाचा श्रीगणेशा केला. दिड महिन्यामध्ये तलावातील मोठया प्रमाणात गाळ काढण्यात आला. हा गाळ काढल्यामुळे पाणी साठा वाढला, पाणी पाझरण्यास सुरूवात झाली तसेच या गावाने अनेक शेतकर्‍यांनी नव्याने जमिनीही तयार झाल्या पुढील वर्षापासून पिंगोरी गावठाणाचा टँकरही बंद झाला.

या जयगणेश जलसागरा मधून गाळ काढण्यापासून पिंगोरीतील जलसंधारणाच्या कामांना सुरूवात झाली या कामामध्ये रोटरी क्लबचा वाटा सिहांचा राहिला आहे. रोटरीमुळे शेतकर्‍यांचे जिवन बदण्यास सुरूवात झाली आहे. श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टने तलावातील गाळ काढला तर पुढील वर्षी रोटरी क्लब ऑफ औंध ने दुसर्‍या पाणलोट क्षेत्रातील एका नाल्यातील गाळ काढून कामाला सुरूवात केली. माथा ते पायथा जलसंधारण व मृदृसंधारणाची कामे रोटरी क्लबच्या सहायाने करण्यता आली रो. मिनाताई बोराटे यांनी या कामात हिरहिरीने सहभाग घेतला त्यांच्या मुळेच ही कामे होऊ लागली डोगराना सीसीटी (सलग समतल चर) करण्यात आली. त्या मध्ये फळबाग लागवड करण्यात आली त्या झाडांना ठिबक सिंचनने पाणी देण्यता आले पावसाळयात ओढयाने वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी शेततळी करण्यात आली. एका शेततळयांची क्षमता 4 कोटी लिटर्स तर दुसर्‍याची अडीच कोटी लिटर्स आहे. विशेष म्हणजे चार कोटी लिटर्सचे शेततळे तर नॅचरल सरफेसला म्हणजेच दगडाला पॉलीमर व सिमेंट ने वॉटरफ्रुफिग करुन करण्यात आले आहे. अशा पध्दतीचे हे देशातील पहिले शेततळे तयार करण्यात आले आहे.

या शेततळयातील पाण्याच्या आधारे पंधरा एकर क्षेत्रावर ठिबक सिंचनने तुरडाळ लागवड करण्यात आली आहे. एरवी उन्हाळात पडीक राहणार्‍याया शेतामध्ये या शेततळयातील पाण्यामुळे उन्हाळयातही उत्पन्‍न घेतले जात आहे. उन्हाळयातही पिक घेतल्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्‍नात वाढ होणार आहे.

जलसंधारणाचे काम झाले पाणी अडले परंतु या पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी ठिंबक सिंचन हाच योग्य पर्याय आहे. प्रवाही पाण्याने पाण्याचा गैर वापर होतो, उत्पन्‍न कमी येते, मनुष्यबळ जास्त लागते तर ठिबकने कमी पाण्यात जास्त उत्पन्‍न मिळते व मनुष्य बळही कमी लागते. त्यामुळे या शेततळयाच्या आधारे आगामी काळात संपुर्ण गाव ठिबक सिंचन खाली आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

जलयुक्‍त शिवार अंतर्गत शासनाकडून होणार्‍या कामांची काठेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली शासकीय निधीची गळती थांबवून अधिकाधिक प्रभवी काम करण्यात आली. जलयुक्‍त शिवारच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनीही पिंगोरी गावास भेट देवून जलसंधारणाचे कामाचे कौतुक केले. जलसंधारणाचे कामे करत असतांनाच गावाने रोपवाटीका तयार करुन वृक्षलागवड करण्याची मोहिम सातत्याने राबवली जात आहे.

Post new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

More information about formatting options

CAPTCHA
यह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज
इस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें
1 + 0 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.