SIMILAR TOPIC WISE

Latest

अनाथ नळांसाठी... गळतीमुक्त शहर अभियान

Author: 
मकरंद टिल्‍लू
Source: 
जलसंवाद, ऑगस्ट 2017

“पाणीटंचाईच्या काळातही गळणारी नळं दिसतात. मात्र, ते बदलण्याची कृती होत नाही... करंगळीच्या आकाराच्या निम्मं पाणी नळातून सतत वाहत असेल, तर दरवर्षाला सुमारे ५ लाख लीटर पाणी वाहून जातं. बाहेरगावी गेल्यावर आपण २० रुपयाची पाण्याची बाटली विकत घेऊन पितो, मग एक कोटी रुपयांचं पाणी वाहून जात आहे, असा विचार करून प्रत्येकानं ते वाचवायला हवं. फक्त ६० ते १०० रुपयांचा नळ लावून आपण ही गळती थांबवू शकतो...”

पाणी, जल, water नावे वेगवेगळी; पण परिणाम एकच, तहान भागविणं! माणसांची, प्राण्यांची, शेतीची, उद्योगधंद्यांची! सध्या कुठेही गेलो, तरी चर्चेत येणारी गोष्ट म्हणजे पाणी. तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होणार असं सांगणारे अनकेजण भेटतात, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे, हे मला एका घटनेनं शिकवलं.

२०१२ मधील घटना आहे. मी एकपात्री कार्यक्रमासाठी बीडला गेलो होतो. येताना वाटेत आष्टी नावाचं गाव लागतं. तिथं गरुांसाठी एक चारा छावणी उभारलेली होती. अंगावर जराही मांस नसलेली ती गुरं पाहून मनाला त्रास झाला. पाण्याची इतकी भीषण टंचाई असताना पुण्यात किती पाणी वाया जातं, याची खंत वाटली. हे वाया जाणारं पाणी वाचविण्यासाठी आपण काही करू शकतो का, हा विचार मनात आला. त्यातून सुरू झालं हे अभियान!

पाण्याच्या कमतरतेबद्दल वर्तमानपत्रात वाचायला मिळत होतं. त्या सगळ्या गोष्टी मनावर परिणाम करीत होत्या. त्यातच मित्राबरोबर मी पिंपरी-चिंचवड भागातील एका सरकारी ऑफिसमध्ये गेलो होतो. काम झालं. जिन्यावरून उतरताना एका गोष्टीनं लक्ष वेधलं. तळमजल्यावर लेडिज टॉयलेट होतं. त्यातून पाण्याचा मोठा आवाज येत होता.

मी बाहरे बसलेल्या काउंटरवरच्या माणसाला म्हणालो, “पाण्याचा मोठा आवाज येतोय. तासाभरापूर्वीही येत होता. प्लीज काय झालंय, ते चेक करता का?”

त्यानं कुणाला तरी पाठवलं. मला येऊन म्हणाला, “काई विशेष नाही. आत नळ तुटलाय, त्याचं पाणी प्लास्टिकच्या भांड्यात पडतंय, म्हणून आवाज येतोय.”

सगळीकडं पाणी टंचाईचा प्रश्‍न असताना ‘वाया जाणारं पाणी हा काही मोठा प्रश्‍न नाही’ असं म्हणताना बघून मी अस्वस्थ झालो.

मी म्हटलं, “अहो, सगळीकडं पाण्याची टंचाई आहे, अशा वेळी आपण ते वाचवलं पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का?”

तो म्हणाला, “वाटतंय ना! म्हणूनच आठ दिवसांपूर्वी साहेबाकंडं नळाची मागणी केलीय”

हे उत्तर ऐकून मी अवाक्च झालो. म्हणजे आठ दिवस असंच पाणी वाहून जातंय. कोणीच काही करत नाही. मी आणखीनच अस्वस्थ झालो. म्हणालो, “जवळपास कुठं हाडर्वेअरचं दुकान आहे का?”

तो म्हणाला, “का?”

मी म्हटलं, “मी तिथून नवीन नळ आणतो आणि प्लंबरला घेऊन येतो आणि नळ लावतो.” त्याचा सरकारी खाक्या जागा झाला.

तो म्हणाला, “तुम्हाला सरकारी ऑफिसमध्ये नियमानसुार असं करता येणार नाही.”

मी ही म्हणालो, “सरकारी नियम वाचून बघा. नळ काढून नेला तर चोरी होते; पण नवीन लावला तर काय? हे नियमात शोधत बसा. मी चाललो.”

मी हार्डवेअरच्या दकुानात गेलो. तो साहेबाकडे गेला. मी काय करतोय ते त्यानं त्याच्या साहेबाला सांगितलं. साहेबांनी माणूस पाठवला. हार्डवेअरच्या दुकानातून मला बोलावून घेतलं.

“आपण कोण?” साहेबांनी मला विचारलं.

मी कार्ड दिलं. नाव वाचल्यावर ते म्हणाले, “तुम्ही हास्याचे एकपात्री कार्यक्रम करता ना? तुमचं नाव ऐकलं आहे. काय झालं?”

मी घडलेला प्रसंग सांगितला, कार्ड वाचत ते म्हणाले, “तुम्ही तर पुण्यात राहता. पुण्यात तर तुम्हाला खडकवासल्याचं पाणी येतं. हे तर पवनेचं पाणी. तुम्ही कशाला वाचवताय?”

हे ऐकून मी सर्दच झालो. मी म्हणालो, “पाणी हे पाणीच असतं. कुठलंही पाणी वाचलं, तरी कोणाची तरी तहान भागणार आहे. मी माझ्या समाधानासाठी हे करतो आहे. यात कुणालाही दोष देत नाहीये आणि खर्चही कुणाकडून परत मागणार नाहीये...तेव्हा मला नळ बदलू द्या.”

ते खजील झाले. त्यांनी त्यांच्या प्लंबरला बोलावलं. गोडाऊनमध्ये नळ होते. त्यातील एक नळ आणून माझ्यासमोर नवीन नळ लावला.

या घटनेनं मी विचारात पडलो. जगण्यासाठी पाणी आवश्यक असताना त्या बद्दल एवढी अनास्था का , हाच विचार मनात घोळत राहिला. नुसतं बोलण्या ऐवजी या परिस्थिती त सुधारणा करता येईल का , याचा विचार करत राहिलो . मग निरनिराळ्या सरकारी ऑफिसमध्ये, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, शाळा यामध्ये उगाचच चक्कर मारू न पाण्याची गळती कुठे आहे का , ते ब घायला लागलो आणि लक्षात आलं की गळती तर आहेच ; परंतु त्या हू न ही जास्त अनास्था आहे. पाणी वाचवायला हवं , याविषयी संवेदनशीलतेचा अभाव आहे. याच दरम्यान मी ‘ रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईम सिटी ’ चा अध्यक्ष झालो. ‘ रोटरी ’ तर्फे २०० हू न अधिक देशांत ३४ हजारांहून अधिक क्लब्ज मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मग ठरवलं आपण ‘ पाणी वाचवा अभियान ’ उभारायचं.

इतर संचालक व सदस्यांशी चर्चा केली आणि अभियानाला सुरुवात केली. हे अभियान कसं राबविता येईल, याचा अभ्यास करायला लागलो. पाण्याचं पुनर्भरणही महत्त्वाचं आहे; परंतु ज्यानं एकही लीटर पाणी वाचवलं नाही, त्याला पुनर्भरण करायला सांगणं म्हणजे पहिलीतल्या मुलाला एम.बी.ए.चा अभ्यास कर असं सांगण्यासारखं आहे, असं मला वाटलं. पुनर्भरण करायचं आहे. मात्र, तत्पूर्वी प्रत्येकाला समजेल, प्रत्येकाला सहभागी होता येईल अशा पद्धतीनं मांडणी करायची, असं ठरवलं. सर्वसाधारणपणे लोकं मार्च महिन्यात ‘पाणी वाचवा’ म्हणतात, आम्ही १ जुलै, २०१२ पासून पावसाळ्यातच ‘पाणी वाचवा अभियाना’ला सुरुवात केली. अभियानाचं बारसं केलं - ‘एक कोटी लीटर पाणी वाचवा अभियान’! या अभियानाचे चार टप्पे ठरविण्यात आले. ते पुढीलप्रमाणे-

पहिला टप्पा - सामाजिक सवयींमध्ये बदल घडविणं :
बदलत्या जीवनशैलीमुळं पुण्यात हॉटेलमध्ये खायला जाण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. अनेक हॉटेलमध्ये पाण्याचे ग्लास भरून दिले जातात. अनेकदा अर्धवट पाणी प्यायल्यानं लाखो लीटर पाणी वाया जातं, त्यामुळं आम्ही हॉटेल व्यावसायिकांना आवाहन करण्याचं ठरवलं की, त्यांनी यापुढे टेबलवर ‘जार’मध्ये पाणी भरून ठेवावं आणि नागरिकांनी ते आवश्यकतेनुसार घ्यावं.

अभियानाची सुरुवात ‘बालगंधर्व’ चौकातील ‘गंधर्व’ हॉटेलपासून केली. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता अशी रॅली काढली. यामध्ये ‘रोटरी’तले सदस्य, ‘नवचैतन्य हास्ययोग परिवारा’तले सदस्य, ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’तले विद्यार्थी सहभागी झाले. हे अभियान दोन पातळीवर राबवण्यास सुरुवात केली. एक म्हणजे माठेी हॉटेल्स व दुसरे म्हणजे ‘अमृततुल्य’(चहाची दुकानं). या अभियानात सहभागी होण्याचा फायदा त्यांना काय होणार हे समजावून सांगायला लागलो.

वर सांगितलेल्या पद्धतीमुळे-
१. हॉटेलमधील सुमारे ७० टक्के पाणी वाचतं.
२. जिथं पाणी थंड करून दिलं जातं, त्या ठिकाणची वीज वाचते.
३. वेटरवरचा अनावश्यक ताण वाचतो.
४. टंचाईच्या काळात टँकरवरचा खर्च वाचतो.
५. मुख्य म्हणजे एका चांगल्या सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याचा मालक आणि ग्राहक या दोघांनाही आनंद मिळतो .

एक वर्षांत आम्ही सुमारे ७०० हॉटेल्स मध्ये जाऊन समाज प्रबोधन केलं. यामुळं अनेक हॉटेलमध्ये पाणी देण्याची पद्ध त बदलली आहे. ‘ अमृततुल्य ’ मध्ये सर्वांत छान प्रतिसाद मिळाला. एकानं दुसर्‍ याला, दुस र्‍यानं तिसर्‍ याला सांगितलं आणि अनेक ‘ अ मृततुल्य ’मध्ये आता पाणी ग्लास भरून न ठेवता ते ‘ जार ’ मध्ये ठेवलं जात आहे. एक ‘टिल्लू’ सुरुवात आता मोठा परिणाम करीत आहे.

दुसरा टप्पा - वाया जाणारं पाणी वाचविणं :


पाणीटंचाईच्या काळातही गळणारी नळं दिसतात. मात्र, ते बदलण्याची कृती होत नाही. नळ सार्वजनिक असला, तरी पाणी आपलं आहे, एकाच धरणातून येणारं आहे. कुठूनही पाणी वाया गेलं, तरी पाणी धरणातलचं कमी होणार आणि उद्या आपल्यालाही कमी मिळणार. हा विचार सर्वांच्या मनात रुजविण्याची गरज आहे, असं लक्षात आलं. करंगळीच्या आकाराच्या निम्मं पाणी नळातून सतत वाहत असेल, तर दरवर्षाला सुमारे ५ लाख लीटर पाणी वाहून जातं. बाहेरगावी गेल्यावर आपण २० रुपयांची पाण्याची बाटली विकत घऊेन पितो, मग एक कोटी रुपयांचं पाणी वाहून जात आहे, असा विचार करून प्रत्येकानं ते वाचवायला हवं. फक्त ६० ते १०० रुपयांचा नळ लावून आपण ही गळती थांबवू शकतो.

मजूर अड्ड्यात तुटक्या नळातून दिवसभर पाणी वाहात असतं, हे समजलं. तिथून अभियानाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात केली.

मागील वर्षी आम्ही जनजागृतीसाठी ‘ जलरक्षक प्रबोधिनी ’ संस्था स्थापन केली. यात एक लाख जलरक्षक तयार करण्याचे उद्दिष्ट आखलं आहे. मध्यतंरी पुण्यातील एका शाळेत मी कार्यक्रमासाठी गेलो होतो. मुलांना हसवून झाल्यावर आम्ही वेगळा उपक्रम केला. मुलांना घेऊन शाळेत पाण्याची किती गळती होत आहे हे पाहण्यासाठी एकत्र चक्कर मारली. शाळेच्या स्वच्छतागृहांमध्ये गेलो. शौचालयामधील नळ अर्धवट बंद होता. त्या नळाला पाण्याची बाटली लावली, तर ती बाटली किती वेळात भरते यावरून वर्षाला किती पाणी वाया जातं, याचा अभ्यास करायचं ठरलं. आता सर्वांसमक्ष ती बाटली धरून स्वच्छतागृहांमध्ये उभे राहायला मुलं लाजायला लागली.

मी म्हणालो, “मी बाटली धरतो, ती बाटली किती वेळात भरते ते तुम्ही बघा.” १ मिनिट १५ सेकंदात १ लीटरची बाटली भरली. मी मुलांना म्हणालो, “याचाच अर्थ ५ मिनिटाला ४ लीटर, दिवसाला १ हजार १५२ लीटर आणि वर्षाला ४ लाख २० हजार लीटर वाहून जाणार्‍या पाण्याचा खजिना तुम्ही शोधला आहे.”

मुलांना हा खेळ आवडला! दुसर्‍या टॉयलेटमध्ये मीच बाटली धरणार, याबद्दल प्रत्येकजण पुढाकार घ्यायला लागला. संपूर्ण शाळेत एकूण किती गळती होत आहे, याचा नंतर हिशोब मांडला. आकडा आला वर्षाला समुारे २२ लाख लीटर!

हा विषय ‘ वनराई ’शी निगडित संयोजकांना सांगितला. त्यांना ता आवडला. पयार्वरणासाठी कायम उत्साहाने कार्य करणार्‍या या संस्थेनं १०० हून अधिक शाळांतील प्रतिनिधींसाठी माझं व्याख्यान ठेवलं. ‘ वनराई ’नं केलेल्या सहकार्यानं अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला गेला. आतापर्यंत या अभियानात ८३ हून अधिक शाळा ३७ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विविध शाळा, कॉलेज, रोटरी क्लब, वनराई, चेंज मेकर्स, वसुंधरा स्वच्छता अभियान, मिलन मैत्री परिवार, जैन सोशल ग्रुप असे अनेकजण सहभागी झाले आहेत. लोकसहभागातून थेट १० हजारांहून अधिक नळ बदलण्यात आले आहेत. या अभियानाच्या प्रेरणेतून उत्स्फूर्तपणे हजारो नळ बदलण्यात आले आहेत. आम्ही ‘अनाथ नळा ’साठी काम करतो. या उपक्रमामध्ये सहकार्य करू इच्छित असल्यास वाढदिवस, पुण्यतिथी अशा कोणत्याही निमित्ताने आम्ही नळदान स्वीकारतो. जरूर संपर्क साधावा.

तिसरा टप्पा - व्यक्तिगत सवयीत बदल घडविणं :


सामाजिक भान राखून प्रत्येकानं पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा वापर काटकसरीनं करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला दररोज किमान एक बादली पाणी वाचवणं शक्य आहे. उदा. फ्लश, शॉवर, बाथटबचा वापर बंद करणं. फ्लश टँकचा वापर अनिवार्य असल्यास त्यामध्ये एक लीटर पाण्याची बाटली भरून टाकून ठेवावी, म्हणजे वापरल्या जाणार्‍या पाण्यापैकी एक लीटर पाण्याची बचत होते. तसेच प्लास्टिकचा देखील पुनर्वापर होतो. पुरुषांनी दाढी करताना लागणार्‍या पाण्यासाठी बेसीनमधल्या नळाऐवजी भांड्याचा वापर करावा, तसेच भांडी घासताना, कपडे धुताना नळ गरजेनुसार चालू ठेवावा, तसचे काम करताना नळ बंद करण्याची सोय स्वतःच्या किंवा मोलकरणींच्या हाताजवळ ठेवावी. पाइप लावून गाडी न धुता कपड्यानं साफ करावी, घराच्या बागेसाठी ठिबक सिंचन वापरावे. असे अनेक उपाय आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. याबाबत एक चित्रफित तयार करून इंटरनेटद्वारा ‘ यु-ट्यूब ’वर अपलोड करण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबाने ठरवल्यास किमान पन्नास ते साठ लीटर पाणी वाचवता येणं सहज शक्य आहे. असा सकंल्प फक्त दोन लाख कुटुंबांनी केला, तर सुमारे ३६५ कोटी लीटर पाणी वाचवता येते. या संकल्पात सहभागी होणार्‍यांचे लेखी फॉर्म भरून घेत आहोत.

चौथा टप्पा - जलपुनर्भरणासाठी प्रोत्साहन देणं :


अनेक सोसायटी, शाळांमध्ये ‘पाण्याशी मैत्री, जीवनाची खात्री’ या विषयावर व्याख्यान देऊन जागृती करीत आहे. पाण्याचे जमिनीत ‘ फिक्स्ड डिपॉझिट ’ करण्यासाठी उपक्रम राबवत आहे.

पाणी वाचविण्याचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध मार्गांचा अवलबं करण्यात येत आहे. यंदाच्या २६ जानवेारी प्रजासत्ताक दिनापासून एक नवा मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. एकपात्री कायर्क्रम, व्याख्यान यासाठी गेल्यावर आयोजक सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देतात. ते घेणं बंद केलं आहे. आता अगोदर आयोजकांना सांगतो की, ‘एक ‘नळ’ देऊन सत्कार करा’. यामागची भूमिका लाकेांना कळते, तेव्हा अनेकजण आम्हीदेखील गळणारे नळ बदलू, असे आवर्जून सांगतात. याप्रकारे वर्षाला किमान १ लाख लोकांपर्यंत हा विचार पोहोचवता येईल, याचा आनंद आहे.

मागील वर्षी परमपूज्य श्री. प्रवीणऋषीजी म.सा. याचे उपस्थितीत ’ पाण्याशी मैत्री, जीवनाची खात्री ’ या माझे व्याख्यान झाले. कृतीवर आधारित ही संकल्पना त्यांना खूप भावली. ते नंतर भरभरून बोलले. ...आणि उपस्थितांना म्हणाले हमे इनके साथ जुडना है . त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ’ आनंदतीर्थ महिला मंच ’ च्या उत्साही महिला या अभियानात सामील झाल्या आणि त्यांनी हे अभियान महाराष्ट्रभर कृतीने नेले.

हे अभियान आता पुण्याबरोबर तळेगाव दाभाडे, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा अशा ३८ गावांत सुरू झालं आहे. ‘सोसायटी ते झोपडपट्टी’ असं सर्वत्र या अभियानाचा विस्तार होत आहे. नागरवस्ती विभागाच्या सहकार्याने कष्टकरी महिलासंमोर या विषयावर आधारित मोहीम राबवण्यात येत आहे. ही चळवळ उभारताना अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. ‘रोटरी’तील सहकारी, विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यानं अनेकजण जोडले जाऊन या कृतीवर आधारित चळवळ आकार घेत आहे. आतापर्यंत सुमारे १०० कोटी लीटरहून अधिक पाणी वाचवलं आहे. आमचं ध्येय आहे ‘जलरक्षका’च्या, लोकांच्या सहभागातून दर दिवशी १ काटेी म्हणजे म्हणजे वर्षाला ३६५ कोटी लीटर पाणी वाचविण्याचं!

जलरक्षक प्रबोधिनी (गळतीमुक्त नळ अभियान), पुणे

संपर्कः ९७६६३३४२७७, e.mail - mtilloo@gmail.com

Post new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

More information about formatting options

CAPTCHA
यह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज
इस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें
4 + 15 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.