लेखक की और रचनाएं

देशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी

Source: 
जलसंवाद, डिसेंबर, 2017

पावसाच्या दृष्टीने श्रीलंकेचे तीन भाग पडतात. ओला प्रदेश ज्या भागात २००० मीमीपेक्षा जास्त पाऊस पडतो) मध्यम प्रदेश (१५०० ते २००० मीमी इतका पाऊस पडतो) व कोरडा प्रदेश (जिथे १५०० मीमी पेक्षा कमी पाऊस पडतो) असे ते तीन भाग होत. श्रीलंकेत १०३ नद्यांची खोरी आहोत. सर्वात मोठा असलेली महावेली ही नदी असून तिची लांबी ३३५ किलोमीटर आहे.

श्रीलंकेत सरोवरांची संख्या बरीच मोठा आहे. यापैकी बरीच पारंपारपिक सिंचनाकरिता वापरली जातात आणि नव्याने बांधलेली सरोवरे ही बहुउद्देशीय आहेत. या देशात भूजलाचे साठे ७८०० दशलक्ष घनमीटर असून ग्रामीण भाग हा बहुतांश भूजलावरच अवलंबून आहे. ग्रामीण भागातील ७२ टक्के जनता ही संपूर्णपणे भूजलावरच निर्भरित आहे.

देशातील पाण्याच्या गुणवत्तेबद्दल जास्त सांख्यिकीय माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्याबद्दल मतप्रदर्शन करायला विशेष वाव नाही. तरीपण श्रीलंका नॅशनल वॉटर डेव्हेलपमेंट रिपोर्ट प्रमाणे पेयजल गुणवत्तेत खालील त्रूटी प्रामुख्याने दिसून येतात :

१. पाण्यात नायट्रेटचे प्राण जास्त आहे.
२. सार्वत्रिक अस्वच्छतेमुळे बॅक्टेरियाचेही प्राण जास्त आहे.
३. पाणी शुद्धीकरणाची अपूरी सोय.
४. उद्योग आणि शेती यातून विसर्जित झालेली विषारी रसायने यामुळे पाण्याचा दर्जा खालावला आहे.

नद्यांमधील पाणीही प्रदूषित झालेले आढळते. विशेषतः ज्या नद्या शहरांमधून जातात त्यांचेमध्ये घरगुती व औद्योगिक क्षेत्रात तयार होणारे कोणतीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाते. कोलंबो मधून जामारी कदम नदी तर अशा पाण्याची महत्वाची शिकार बनली आहे. कदम नदीत वाळू उपसाही वेगाने होत आहे.

बहुतांश सरोवरांतील पाणी मात्र चांगल्या गुणवत्तेचे आढळते. जी सरोवरे शहरांचे जवळ वसली आहेत तिथेही वरील प्रमाणे प्रदूषण झालेले आढळते. जी गोष्ट तलावांची तिच गोष्ट भूजलात आढळून येते.

अति उपशामुळे ब-याचशा विहीरींत खारे पाणी वाढत चालले आहे. समुद्राचे खारे पाणी जिथे वाट सापडेल तिथे भूडलात प्रवेश करुन तिथले पाणी खारे बनविते.जाफना व कल्पतिया परिसरात भूजलात नायट्रेटचे प्रमाण शेतीत अति खतांच्या वापरामुळे वाढले आहे.

श्रीलंका हा देश विषुववृत्ताजवळ वसले असल्यामुळे तिथे उष्णकटिबंधीय हवामान आढळते. येथील सरासरी पर्जन्यमान १८६१ मीमी असून त्याची वाटणी खालीलप्रमाणे आढळते :

मार्च-एप्रिल

२६८ मीमी

१४ टक्के  

मे-सेप्टेंबर

५५६ मीमी

३० टक्के

ऑक्टोबर-नोव्हेंबर

५५८ मीमी

३० टक्के

डिसेंबर-फेब्रुवारी

४७९ मीमी

२६ टक्के

 

श्रीलंकेत १३००० मानव निर्मित सरोवरे आहेत. त्यापैकी ८० मोठी धरणे बांधल्यामुळे निर्माण झालेली आहेत. ते शेतीच्या सिंचनासाठी, पिण्यासाठी, स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी व जनावरांसाठी पाणी पुरवितात. त्याचबरोबर जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठीही मदत करतात. या देशात दोन महत्वाच्या नद्या आहेत. त्या म्हणजे महावेली (३५५ किमी.) आणि महावालूओया (१६४ किमी.) या होत. देशातील सर्व नद्या मिऴून एकत्र लांबी मोजली तर ती ४५६० किलोमीटर भरते.

या देशात शेतीचे दोन हंगाम आहेत. मे ते सेप्टेंबर (महा) आणि डिसेंबर ते फेब्रुवारी (याला) असे आहेत. देशातील एकूण पर्जन्यमान ५०० मीमी ते ५००० मीमी आहे. भूपृष्ठावर ४३००० ते ४५००० mcm आणि भूजल ७८०० mcm आहे.

Post new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

More information about formatting options

CAPTCHA
यह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज
इस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें
2 + 1 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.