महाराष्ट्र सरकारचा जीआर

अस्तित्वातील सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व नाला खोलीकरण करणे तसेच खोलीकरणासह नवीन सिमेंट नाला बांध बांधणे : मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र शासन
जलसंधारण विभाग
शासन निर्णय क्रमांक : राकृयो - 2011/प्र.क्र.72/जल-7

प्रस्तावना :


सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व नाला खोलीकरण करण्याचे प्रयोग ता.शिरपूर जि.धुळे (स्वयंसेवी संस्था), भेंमडी, ता.वरूड, जि.अमरावती (कृषि विभाग), सावळी सास्ताबाद, ता.जि.वर्धा (भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा) येथे राबविण्यात आले आहेत. शिरपूर जि.धुळे येथे राबविण्यात आलेल्या योजनेप्रमाणे राज्यात इतरत्र कार्यक्रम राबविण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधी व अनेक संस्थांकडून येत होती. ही योजना राज्यभर राबविण्याच्या दृष्टीने भेंमडी. ता.वरूड, जि.अमरावती व सावळी सास्ताबाद, ता.जि.वर्धा येथे राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर योजना राबविल्या आहेत. वर नमूद तिन्ही प्रयोगांचा तौलनिक अभ्यास करून सिमेंट नाला बांधातील गाळ काढून नाला खोलीकरण करण्याचे भौगोलिक व Topographical परिस्थितीनुसार मॉडेल सुचविण्याकरिता संचालक, भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भाधीन शासन निर्णय दि.22 जानेवारी 2013 व 27 फेब्रुवारी 2013 अन्वये तांत्रिक समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने दि.20 एप्रिल 2013 च्या पत्रान्वये शासनास अहवाल सादर केला आहे. सदर अहवाल शासनाने स्वीकृत केला असून अहवालातील शिफारशी विचारात घेऊन अस्तित्वातील सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व खोलीकरण आणि खोलीकरणासह नवीन सिमेंट नाला बांध बांधण्याकरिता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :


सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व नाला खोलीकरण करण्याचे प्रयोग ता.शिरपूर जि.धुळे, भेंमडी. ता.वरूड, जि.अमरावती, सावळी सास्ताबाबद, ता.जि.वर्धा येथे राबविण्यात आले आहेत. या तिन्ही प्रयोगांचा तौलनिक अभ्यास करून संचालक, भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा, पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिनांक 20 एप्रिल 2013 रोजी अहवाल शासनास सादर केला आहे. सदर अहवाल शासनाने स्वीकारला असून अहवालातील शिफारशी विचारत घेऊन अस्तित्वातील सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व खोलीकरण आणि खोलीकरणासह नवीन सिमेंट नाला बांध बांधणे या उपचारास मान्यता देण्यात येत आहे.

2. नाला खोलीकरण या योजनेचे उद्दिष्ट :


1. नाला खोलीकरण या योजनेचा मुख्य हेतू भूपृष्ठीय पाणी साठवण (Surface water storage) नसून भूजल पुनर्भरण हा आहे. पाणीसाठा भूपृष्ठीय असल्यास बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. त्याऐवजी भूपृष्ठाखाली पुनर्भरित पाण्याचे बाष्पीभवन जवळ - जवळ निरंक असते.
2. नालापात्रात गाळ साठल्याने नाल्याचा (Cross sectional Area) कमी होतो. नालापात्र उथळ झाल्याने त्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते व पूरस्थितीत प्रवाहाचे पाणी मूळ नाला पात्राबाहेरील भागात पसरून लगतच्या शेतातील मातीचा सुपिक थर वाहून जातो. नाला खोलीकरणाने ही समस्या काही अंशी कमी होईल.
3. खोलीकरणामुळे उपलब्ध होणाऱ्या पाणी साठ्यामुळे पुनर्भरणासाठी अतिरिक्त पाणी व अवधी (Retention Period) मिळाल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ होईल. पर्यायाने त्या परिसरात मान्सूनोत्तर काळात अधिक कालावधीपर्यंत भूजल उपलब्ध होऊ शकेल.
4. ही उपाययोजना शक्य तेथे अस्तित्वातील ज्या बंधाऱ्यांचे पाणी साठा क्षेत्र गाळ - वाळू इत्यादी मुळे बुजलेले आहे, अशा निरूपयोगी बंधाऱ्यांच्या वरील बाजूस (Up stream Side) घेणे अपेक्षित असल्याने, असे बंधारे पुनरूज्जीवित होतील व त्या परिसरात नव्याने बंधारा घेण्याचा खर्च वाचेल.
3. अस्तित्वातील सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व खोलीकरण करणे व खोलीकरणासह नवीन बंधाऱ्यांची कामे घेण्याबाबतचे निकष :

महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 92 टक्के क्षेत्र काळा कठीण पाषाण (Basaltic Rock) 4 टक्के रूपांतरीत पाषाण (Metamorphic Rock) व 4 टक्के भूभाग वालुकामय पाषाण (Sedimentary Rock) असे एकूण 96 टक्के क्षेत्र हे कठीण पाषाणाने व्याप्त आहे. उर्वरित 4 टक्के भूभाग हा गाळाचा प्रदेश (Alluvial Terrain) आहे. त्यामुळे कठीण पाषाणाच्या भूभागात ही उपाययोजना राबविण्याची तत्वे व गाळाच्या भागासाठीची मार्गदर्शक तत्वे यात अंशत: बदल होणे आवश्यक आहे. तथापि, आवश्यक तेथेच व भूजल शास्त्रीय दृष्ट्या सुयोग्य स्थळी नाला खोलीकरण उपाययोजना राबविल्यास अधिकाधिक अपेक्षित लाभ मिळू शकेल.

कठीण पाषाणाचा भूभाग (Basaltic Terrain) / गाळाचा भूभाग (Alluvial Terrain) :


3.1 नाला खोलीकरण हे फक्त 2nd व 3 rd Order Streams या सर्वसाधारण वहनक्षेत्र (Runoff Zone) 2nd व 3 rd order या पुनर्भरण क्षेत्र (Recharge Zone) तर 4 thú order व त्यापेक्षा मोठे जलप्रवाह हे साठवण क्षेत्र (Storage Zone) या भागांमध्ये स्थित असतात.
3.2 उपलब्ध अपधावेच्या (Surface Runoff Calculation) सिमीत राहूनच नाला खोलीकरणाची लांबी निश्चित करावी.
3.3 ज्या ठिकाणी नालापात्रात वाळू साठा आहे अशा नाल्यांचे खोलीकरण करू नये.
3.4 ज्या ठिकाणी नालापात्रांची नैसर्गिक खोली 3 मीटरपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी खोलीकरण भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनाने करावे.
3.5 नाला खोलीकरणासाठी कठीण पाषाणात खोदकाम करू नये म्हणजेच मुरूमाच्या थराखाली खोदकाम नसावे. कारण या उपाययोजनेद्वारे भूस्तरावरील उथळ जलधारक (Shallow Aquifer) पुनर्भिरित करणे हा उद्देश आहे. कठीण पाषाणाची जलधारक क्षमता अत्यंत कमी असल्याने तसेच त्यातून जमिनीखाली पाणी झिरपण्याची गती अत्याधिक मंद असल्याने कठीण पाषाणात खोदकाम केल्यास योजनेचा खर्च फार जास्त होईल, तुलनेत पुनर्भरण नगण्य स्वरूपाचे होईल.
3.6 नाला खोलीकरणाची कमाल मर्यादा नाला तळापासून (Nala Bed) 3 मीटर असावी.
3.7 अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये ही कामे अग्रक्रमाने राबविण्यात यावीत.
3.8 अस्तित्वातील बंधाऱ्यांच्या उर्ध्ववाह क्षेत्र (Up Stream Side) मध्ये नाला खोलीकरण केल्यास जास्त लाभदायक होईल.
3.9 गाळाच्या प्रदेशात (Alluvial Area) नाला खोलीकरणाचे काम हाती घेणे योग्य नाही. कारण अशा ठिकाणी Clay चा थर Imperviousúv असल्यामुळे सदर पाणी जमिनीत मुरून भूजलामध्ये रूपांतरित होणार नाही. त्यामुळे अशा परिसरात खोलीकरण करण्यात येवू नये. सर्वसाधारणपणे असा भूभाग नाला खोलीकरणासाठी भूशास्त्रीयदृष्ट्या अनुकूल नसतो. अशा परिसरात भूस्तरातील गाळाचा (Clay) थर हा पाणी खाली झिरपू देत नसल्याने नाला खोलीकरण केले तर त्यामध्ये पाण्याची साठवण होईल, परंतु हे साठलेले पाणी जमिनीत मुरून भूजलात रूपांतरित होणार नाही.
3.10 गाळाच्या भूभागातील 'बझाडा' भूस्तराचा भाग हा नाला खोलीकरण या उपाययोजनेसाठी अत्यंत योग्य आहे. कारण सातपुडा पर्वत श्रेणीच्या, पायथ्याच्या टेकड्या (Foot Hills) चा उतार संपल्या - संपल्याच बझाडा प्रकारचा भूस्तर असून तो लहान मोठे टोळदगड (Boulders) व टेकड्यांची धूप झाल्याने वाहून आलेले Silt यापासून बनलेला आहे. या भूस्तराची जलग्रहण क्षमता ( Water Intake Capacity) जास्त आहे. गाळाच्या प्रदेशाच्या एकूण विस्ताराच्या तुलनेत बझाडा भूभाग हा फारच कमी आहे. परंतु गाळाच्या भूभागात उपलब्ध होणारे भूजल हे प्रामुख्याने अशा बझाडाझोन द्वारेच भूस्तरात पुनर्भरित होते. त्यामुळे अशा भूभागात मोठ्या प्रमाणावर नाला खोलीकरण उपायोजना राबविण्यात यावी.

4. मापदंड :


गाळ काढणे व नाला खोलीकरण करण्यासंदर्भातील जलसंपदा विभागाचेचे Regional Schedule of Rates (RSR) दर लागू राहतील. तसेच ही कामे मशीनरीच्या सहाय्याने करणे बंधनकारक राहील.

5. सदरची कामे ही मृद व जलसंधारणाच्या सर्व योजनांतर्गत योजमांमधून घेणे अनुज्ञेय आहे.
6. या संदर्भातील तांत्रिक व अंमलबजावणीबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी निर्गमित कराव्यात.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 2013050913284881526 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सुनील चव्हाण
उप सचिव, महाराष्ट्र शासन

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading