मरणासन्न नद्या आणि आपण

12 Jan 2016
0 mins read

नद्यांबद्दल बोलताना नदीला एकूणच जगामध्ये आणि आपल्या संस्कृतीतसुध्दा काय स्थान आहे हे वेगळ कुणीकाही सांगायला नको. मग ती सिंधू संस्कृती असो, मेसोपोटोमियाची प्रगत संस्कृती असो किंवा इजिप्त मधली नाईलच्या काठी वसलेली संस्कृती असो. जगभरातल्या प्रत्येक मानवी संस्कृतीला जर कुणी आधार दिला असेल तर तो नद्यांनी. हे आज सांगण्याची आवश्यकता अशासाठी आहे की माणूस म्हणजे आज आपण सगळेजण प्रगतीच्या अशा टप्प्यात आलो आहोत की आज आपल्याला कुठलीही बाब अश्यक्य नाही.

नद्यांबद्दल बोलताना नदीला एकूणच जगामध्ये आणि आपल्या संस्कृतीतसुध्दा काय स्थान आहे हे वेगळ कुणीकाही सांगायला नको. मग ती सिंधू संस्कृती असो, मेसोपोटोमियाची प्रगत संस्कृती असो किंवा इजिप्त मधली नाईलच्या काठी वसलेली संस्कृती असो. जगभरातल्या प्रत्येक मानवी संस्कृतीला जर कुणी आधार दिला असेल तर तो नद्यांनी. हे आज सांगण्याची आवश्यकता अशासाठी आहे की माणूस म्हणजे आज आपण सगळेजण प्रगतीच्या अशा टप्प्यात आलो आहोत की आज आपल्याला कुठलीही बाब अश्यक्य नाही. आज आपण चंद्रावर पोहोचलेलो आहोत, मंगळावर जाण्याच्या तयारीत आहोत आणि जर या विश्वामध्ये इतरत्र कुठे सजिवसृष्टी असलेला गृह असेल तर त्याच्यावर पोहोचण्याची क्षमता जर कोणाची असेल तर ती केवळ आपलीच आहे. त्यामुळे पृथ्वीच्या 460 कोटी वर्षांच्या इतिहासात पृथ्वीनेसुध्दा ह्या संपूर्ण कालखंडात - प्रगत बुध्दीमान, सक्षम, बलशाली असा जर जीव, अशी प्रजाती जर कुठली पाहिली असेल तर ती आपली माणसाची.

पण आपण आज इतक्या पुढे गेलेलो आहोत, या महत्वाच्या टप्प्यात आहोत की निसर्गाचे नियमसुध्दा आपल्यावर मर्यादा टाकू शकत नाहीत, आपल्याला बध्द करु शकत नाहीत. उत्क्रांतीचा नियमसुध्दा आपल्यासाठी अपवाद आहे आणि त्याच्यावर मात करुन आपण आपल आयुष्य वाढवू शकतो, आपण आपली प्रगती करुन घेऊ शकतो, आणि कुठल्याही फीजीकल किंवा कुठल्याही जेनेटिकल चेंजेस झाले नाहीत तरीसुध्दा टेक्नॉलॉजी आणि सायन्स याच्यामध्ये जी काही प्रगती केलेली आहे त्याच्या जोरावर आपण निसर्गाला आश्चर्य वाटाव किंवा आश्चर्य व्यक्त कराव अस वाटाव अशा गोष्टी करु शकतो. एकूण पृथ्वीचा आणि निसर्गाचा विचार केला तर या अचाट गोष्टी आहेत. पण त्या आज आपण साधलेल्या आहेत.

पण या सगळ्याची सुरुवात जिथे झाली तिथे आपल्याला जो आधार दिला तो नद्यांनीच. कारण सत्य हे आहे की सिधु असेल, आत्ताचा इलाका मेसोपोटोमिया असेल, तिथल्या टायगरी सिफ्रेटस् नद्या असतील, थेट तिथपासून ते महाराष्ट्रातल्या म्हणजे इनामगावची जी संस्कृती, आपल्याकडे साधारण साडेतीन हजार वर्षांपूर्वी नांदली, या काळाच्या मानाने अत्यंत प्रगत नगर होत, शेतीच्या व्यवस्था होत्या, शेतीसाठी पाणी आणत होते. हे सगळ शक्य झाल ते नद्यांमुळे. तेच आपल्याला प्रवरेच्या काठी नेवासा, जोडवे ही जी काही गावे आहेत तिथेसुध्दा पाहायला मिळते. म्हणजे जगामध्ये, जगातल्या वेगवेगळ्या भागांपासून ते महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे आपल्याला मानवी संस्कृती जिथे प्रगल्भ झाली, जिथे विकसित झाली, जिथे उत्क्रांत होत गेली, जिथे तिने खूप मोठ्या प्रमाणात स्वत:चा विकास घडवून घेतला त्या सुरुवातीच्या महत्वाच्या टप्प्यांमध्ये आपणाला पाण्याला आणि विशेषत: प्रवाहित पाण्याला नदीने मदत केली. म्हृणूनच अजूनही आपण नदीच ऋण मानतो, तीला आपण देवता मानतो, सर्वस्व मानतो. नुसतच मानत नाही तर कित्येक पीढ्या आपण तश्या पध्दतीने वागत आलो.

गंगामाई, कृष्णामाई किंवा या सगळ्या नद्यांना देवतेचे स्थान दिले आहे आपले कुठलेही पवित्र, धार्मिक विधी असतील तर नदीच्या पाण्याला आपण काय महत्व देतो हे आपल्याला सगळ्यांना चांगल माहित आहे. यामुळेच नदीला किंवा नदीच्या पाण्याला आपण पवित्र मानतो. नदी आणि पावित्र्य हे कृतक समिकरणच झालेले आहे. जगातील इतर कुठलीच गोष्ट पाण्याइतकी आणि विशेषत: भारतीय संस्कृतीचा विचार केला तर प्रवाहित पाण्याइतकी म्हणजे नदीइतकी आपल्याला पवित्र नाही. त्यामुळे जर आपल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, धार्मिक विधी पाहिले, तर प्रत्येक धार्मिक विधीमध्ये नदीचे पाणी किंवा गंगाजल प्रातिनिधीक म्हणून हे सगळीकडे आपण वापरतो. याचबरोबर जर आपण मंदिरे पाहिली, तिर्थक्षेत्रे पाहिली तर ती नदीच्या उगमाजवळ असतील, नदीच्या संगमाजवळ असतील किंवा नदीच्या मुखाजवळ असतील.

याच्याही पुढे जाऊन आज आधुनिक काळात आपण या गोष्टी मानतो की नाही याचा पुरावा म्हणजे कुठल्याही पुलावरुन जाताना मग ते पुणे असो, मुंबई असो, औरंगाबाद असो किंवा इतर कुठलेही शहर असो, तिथून पुलावरुन तुमची जेंव्हा गाडी जात असते, ट्रेन जात असते, तेंव्हा चार हात तुम्हाला जोडलेले पाहायलाच मिळतात. म्हणजे आपल्या परंपरेत, आपल्या मनामध्ये अधिपत्याची श्रध्दा नदीने जे काही आपल्याला दिलेले आहे ते किती साचून आहे, किती खोलवर, किती डिपरुटेड आहे याचेच हे उतारे किंवा याचेच हे उदाहरण. अशी ही प्रातिनिधीक उदाहरणे जर पाहायला गेलो तर अशी अगणित उदाहरण आपल्याजवळ आहेत आणि आपण नदीला किती मानतो हे याच्यावरुन पाहायला मिळते. पण काळ बदलला, परिस्थितीसुध्दा बदलली, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनात जे नदीकडे डोळसपणे पाहातात, उघड्या डोळ्यांनी पाहातात त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात नदी संदर्भात आपण जे काही वागतो आहोत त्याच्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात.

कुठलेकुठले प्रश्न आहेत ? तर सर्वात महत्वाचे म्हणजे नद्यांनी आपल्याला जो आधार दिला, आपणाला इथपर्यंत आणण्यासाठी एका महत्वाच्या टप्प्यात जी मदत केली त्यामुळे सुध्दा आपण नदीला आई मानलं, देवता मानलं, पवित्र मानलं, पण त्यांच पावित्र्य आजही टिकून आहे का ? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. आणखीन कुठला प्रश्न आहे? तर आपण त्यांना देवता मानतो. पण त्यांना देवतेसारख वागवतो का? त्याच्याहीपुढे जाऊन आज जसा मानवी संस्कृतीला नद्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात आधार दिला तो आधार देण्याची क्षमता आज नद्यांची आहे का? त्याच्याही पुढे जाऊन आज नद्यांची जी स्थिती झालेली आहे ती काय आहे आणि भविष्यात असेच जर चालू राहीले तर या नद्या उद्या नद्या म्हणून राहतील का ? का त्यांचे दुसऱ्या कुठल्या गोष्टींमध्ये स्थित्यंतर झालेले असेल. या सारखे अनंत प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत.

तसे ते माझ्यासुध्दा मनात होते, या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसत्ता मध्ये काम करत असतांना पाणी, पर्यावरण याच्यावर माझ्या क्षमतेनुसार लिहिण्याचा सातत्याने प्रयत्न करत गेलो. मी अभ्यासक आहे की नाही याची शंका आहे पण माझ्या क्षमतेनुसार जे काही करत होतो त्यात हे सगळे प्रश्न मनात होते. तर हे सगळे प्रश्न मनात असताना याची उत्तरं शोधण्याचा जो काही प्रयत्न केला, हे उत्तर शोधताना ज्या ज्या ठिकाणी फिरलो, लोकांशी भेटलो तज्ञांशी चर्चा केली, त्याच्यावर थोडसं चिंतन केलं, जे काही मला निरीक्षणात पाहायला मिळाले, किंवा जो काही मला सगळा फिरण्याच्या काळात किंवा हे सगळे प्रश्न जाणून घेताना जे काही अनुभव आले, जे काही लोकांकडून ऐकायला मिळाल, तेच मी आज या लेखात मांडणार आहे.

हे मांडताना एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की आतापर्यंत नद्यांबाबत भरपूर अभ्यास झालेला आहे आणि तज्ञांनी या विषयात भूरपूर काम केलेले आहे, त्यात नद्यांच प्रदुषण असेल, त्यांचा बी.ओ.डी., सी.ओ.डी., डिजॉल्व्ड ऑक्सीजन, प्रदूषणाची पातळी, या सगळ्या गोष्टी आहेत. पण इथे एक उद्देश माझा या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये होता की नदी, नदीची अवस्था आणि त्याच्याशी संबंधीत असलेला माणूस, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा माणसावर नेमका काय परिणाम झालेला आहे, माणसाच्या कुठल्या कुठल्या क्षेत्रांना या सगळ्या नदीच्या अवस्थेने वेढलेले आहे, ग्रासलेले आहे, आणि नेमके आपल्यावर त्याचे, माणसावर त्याचे काय परिणाम होतायेत याचा अभ्यास हा माझया मुख्य उद्देश होता.

हा मुख्य मुद्दा या सगळ्या माझ्या पाहणीमध्ये किंवा निरीक्षणामध्ये होता. उद्देश अगदी स्पष्ट होता की नद्यांची आजची जी स्थिती आहे त्याच्याकडे लोकांचे लक्ष वेधायचे. त्याच्या पाठोपाठ आत्ता जी काही नद्यांची स्थिती आहे ही अशीच राहीली आणि आपण अशाच पध्दतीने जर नद्यांना ट्रीट करत राहिलो तर भविष्यामध्ये नद्यांची अवस्था काय असेल याची एक थोड्याश्या प्रमाणात लोकांना जाणीव करुन द्यायची आणि तिसरा उद्देश जो की या लेखाच्या व व्याख्यानाच्या माध्यमातून आणि इतर वेगवेगळ्या अॅक्टीव्हीटीच्या माध्यमातून केला जाईल तो म्हणजे यामध्ये थोडासा अॅक्टीव्हीजम करायचा. नद्यांची स्थिती बदलण्यासाठी जो काही खारीचा वाटा आपल्याला उचलता येईल तो उचलायचा, या उद्देशाने हा सगळा उपक्रम किंवा ही सगळी पाहणी, ठिकठिकाणी जावून करण्यात आली.

याच्यासाठी जो एरीया फिरलो, त्याच्यामध्ये साधारण कोंकण वगळता, महाराष्ट्राचा बराचसा भाग फिरलो. जाईन तेथेे लोकांशी बोललो, प्रत्यक्ष नद्यांच्या पात्रांमध्ये काय अवस्था आहे ती पाहिली, त्या काठावर जगणारे लोक की ज्यांचा आणि नदीचा इतका घट्ट संबंध आहे की तो संबंध जर तुटला तर हे लोक नद्यांच्या लाभांपासून किंवा नदी त्यांना जे काही देते त्याच्यापासून पूर्ण तुटले जातील. अशा लोकांशी चर्चा केली, त्यांचे प्रत्यक्ष अनुभव याच्या बद्दलचे, त्यांच्या मनात असलेल्या शंका, त्यांच्या मनात याच्याबाबत असलेले उपाय, त्यांच्या मनात हे सगळ घडण्याची कारण, ही सगळी जाणून घेतली आणि जे काही या अडीच-तीन महिन्याच्या काळात पाहील ते निरिक्षणाच्या स्वरुपात किंवा त्याच्यावर थोडस ट्रीटमेंट करुन आपल्या समोर मांडतोय.

क्रमश: (भाग - 2 पुढील अंकात)
मा. श्री. अभिजित घोरपडे, संपादक, दैनिक लोकसत्ता, पुणे

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading