संस्था परिचय : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (NEERI नीरी)


राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था :


शाश्वत पाणी योजना म्हणजे , प्रत्येकाला कोणत्याही ऋतूत , दुष्काळ किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाली तरी पिण्या करिता , स्वयंपाक करण्याकरिता आणि इतर कामा करिता पाणी उपलब्ध करून देणे. तसेच शाश्वत पाणी योजनेत जनावरांचा पण समावेश होतो.

देशात पर्यावरण संतुलनाच्या दृष्टी कामे करण्यार्‍या ज्या अनेक संस्था आहे त्यातील एक आघाडीची संस्था म्हणजे निरी- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था. भारत सरकारच्या अंतर्गत येणार्‍या या संस्थेचे कार्यालय हे नागपूर येथे सन १९५८ पासून सुरु झाले . भारताच्या स्वातंत्र्यानंतर च्या काळात पाणी पुरवठा , सांड पाण्याचे निर्मुलन आणि संसर्गजन्य आजार या गोष्टींवर केंद्र बिंदू ठेऊन पर्यावरणाच्या दृष्टी ने कारखान्यांवर नजर ठेवणे किंवा त्यांना मदत करणे हा मुख्य उद्देश . नीरी ही पर्यावरण सायन्स आणि इंजिनीयरिंग क्षेत्रातील देशातील पहिली प्रयोगशाळा आणि Council of Science and Industrial Research (CSIR) चा एक भाग. निरी च्या देशात पाच ठिकाणी प्रयोग शाळा आहे आणि त्या म्हणजे चेन्नई ,दिल्ली , हैदराबाद , कोलकत्ता आणि मुंबई इथे .

निरीचा उद्देश :


- पर्यावरण अभियांत्रिकी या क्षेत्रात शोध कार्य करणे
- कारखाने आणि शासनाला पर्यावरण संबंधित समस्येला मदत करणे
- शहरातील सांड पाण्या वर प्रक्रिया करून ते पाणी बगिच्यात , बगीच्यातील फवार्‍यात किंवा शेती करिता वापरणे. इत्यादी इत्यादी

नीरीचा तसा व्याप बघितला तर खूप मोठा आणि कार्य पण मोठे, पण पाणी क्षेत्रातील कामा मध्ये संस्थेचे काय योगदान आहे हे आपण बघूया . आज सगळी कडे पाण्याची समस्या भेडसावत आहे. आणि एक दुर्मिळ वस्तू झाली आहे. पाण्याची उपलब्धता कमी पण वापर जास्त झाला आहे. अश्या परिस्थितीत सांड पाण्यावर प्रक्रिया करून तेच पाणी पुनःपुन्हा वापरणे हाच एक मार्ग असतो. म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करणे. या दृष्टी ने, नीरी ने, एक आश्रम शाळा आणि वसतिगृह यातून निघणार्‍या सांड पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे आणि तेच पाणी पुन्हा वापरता यावे त्या करिता सांड पाणी प्रक्रिया करायचे एक डिझाईन तयार केले आणि त्याला नांव दिले ग्रे वॉटर treatment प्लांट . नीरी ने तयार केलेल्या एका डिझाईन चा खालील एक नमुना . पाणी कश्या प्रकारे स्वच्छ , होते आणि ते कुठे कुठे वापरता येते हे खालील चित्रात दाखविले आहे.

हे संयंत्र वापरायला आणि देखभालीला पण सोपे, त्या व्यतिरिक्त २०-३० लिटर दर माणसी दर दिवसाला पाण्याची बचत. या संयंत्रा मध्ये ५००० लिटर ते २०००० लिटर पर्यंत सांड पाण्याचे शुद्धीकरण करता येते आणि दोन वर्षात संयंत्राचे पैसे भरून निघतात असे संस्थेचे म्हणणे आहे.

नीरीने UNICEF बरोबर काम करून मध्य प्रदेश मध्ये १०० आश्रम शाळा आणि १०० व्यक्तिगत , ग्रे वॉटर शुद्धीकरण्याचे सयंत्र बसवले आहे.

नीरी-झर :


नीरी-झर , हे पण एक पाणी शुद्ध करण्याचे संयंत्र नीरी ने विकसित केले आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली असतांना लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्या करिता हे संयंत्र वापरल्या जाते. या संयंत्रा द्वारे पूरग्रस्तांना प्रत्येकी ६ -१० लिटर पाणी रोज पिण्या करिता आणि भोजन बनविण्यासाठी देता येऊ शकते. दिसायला सोपे, पण , पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर विजेचा वापर न करता लोकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात एक मोलाची भूमिका घेते. सन २००६ साली बारमेर जिल्ह्यात आणि २००९ साली सुंदरबन जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्या वेळी नीरी ने अनुक्रमे १०० आणि ४०० असे नीरी - झर इन्स्टंट वॉटर फिल्टर लावले होते.

नीरी - झर इन्स्टंट वॉटर फिल्टर

नीरी - झर इन्स्टंट वॉटर फिल्टर हँड पंप अटॅच आयर्न रिमूवल :


‘ड्रिंकिंग वॉटर एंड सॅनिटेशन मंत्रालया’ नुसार आज देशातील २५ राज्ये पाण्यातील वाढत्या लोह मात्रे मुळे प्रभावित झाले आहे, आणि त्याचा सरळ परिणाम मानवाच्या शरीरावर होतो. या लोह मात्रेचा परिमाण कमी करण्याच्या उद्देशाने नीरी ने हँड पंप अटॅच आयर्न रिमूवल एक संयंत्र विकसित केले आहे. या संयंत्रामुळे पाण्यात असलेले १ - ३० mg/lलोह, प्रमाणित केलेल्या ०.३ mg/l पर्यंत आणता येते. अश्या प्रकारची संयंत्रे हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड इथे काम करीत आहे.

हँड पंप अटॅच आयर्न रिमूवल :


सेन्ट्रल वॉटर कमीशन च्या एप्रिल २०१५ च्या एका अहवालानुसार आपल्या देशाला वर्षाला उपलब्ध होणारे एकंदरीत पाणी म्हणजे १८६९ BCM/year. या पैकी उपयोगात येणार्‍या पाण्याची मात्रा असते ती ११२३ BCM/year. या ११२३ BCM² पैकी ६९० BCM/year. असतो भूपृष्ठावरील साठा. भूपृष्ठा वरील इतका मोठा साठा नद्या आणि तलावाच्या रुपात उपलब्ध असून सुद्धा बाष्पीकरण मुळे असलेला पाण्याचा साठा कमी होतो. या वाष्पीकरणा मुळे कामात येणारा पाणी साठा २५ ते ३० टक्क्यांनी कमी होतो किंवा पाणी उडून जाते असे म्हणायला हरकत नाही. इतके असून सुद्धा बाष्पीकरणाला इतक्या गांभीर्याने दखल घेतल्या जात नाही. आपला देश हा उष्ण कटिबंध असल्या कारणाने ७० टक्के भाग हा ८ ते ९ महिने गरमच राहतो. या संपूर्ण दिवसात पाण्याचे बाष्पीकरण सुरूच असते आणि काही भागात तर वर्षाला २५०० ते ३५०० मिली मीटर इतके असते.

बाष्पीकरण कमी करण्याच्या दृष्टीने ‘ड्रिंकिंग वॉटर एंड सॅनिटेशन मंत्रालयाने नीरी ला काही सिस्टीम डेव्हलप करायला सागितल्या . नीरी ने पण त्या अनुषंगाने दोन प्रणाली विकसित केल्या . पहिल्या प्रणालीत पाण्याच्या साठ्याला बांबूच्या तटयांनी झाकायचे आणि दुसरे म्हणजे पाण्याला रसायनाने झाकायचे. छोट्या पाण्याच्या साठ्या करिता बांबूच्या तटयांनी झाकणे जास्त प्रभावी ठरले असले तरी रासायनिक रीत्याने झाकण्या करिता वेग-वेगळ्या दृष्टीकोनातून निरीचा अभ्यास सूरु आहे.

छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्हयातील शाश्वत पाणी योजना :


शाश्वत पाणी योजना म्हणजे , प्रत्येकाला कोणत्याही ऋतूत , दुष्काळ किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाली तरी पिण्या करिता , स्वयंपाक करण्याकरिता आणि इतर कामा करिता पाणी उपलब्ध करून देणे. तसेच शाश्वत पाणी योजनेत जनावरांचा पण समावेश होतो.

या योजने अंतर्गत नीरी , UNICEF आणि पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग विभाग (छत्तीसगड ) यांनी संयुक्तपणे , राजनांदगाव जिल्ह्यातील १२ खेड्यांचे चयन केले. गावकर्‍यांना एकत्र आणून , त्यांचा पाण्याचा उपलब्ध साठा गृहीत धरून आणि पाण्याचा दर्जा ह्या सगळ्याचा विचार करून त्यांना त्याची जाणीव करून द्यावी लागते.

या कामा करिता निवड केलेल्या १२ खेड्यांपैकी ३ खेड्यांनी सहमती न दिल्या मुळे ९ गावांचाच शाश्वत पाणी योजने अंतर्गत समावेश करण्यात आला आणि ती गावे आहेत ठाकुरतोला, गर्रा, मुराई, पुरेना, धोडिया, कुटेलीखुर्द, खैरी, घिरघोली आणि गाभरा. हे काम दिसायला सोपे वाटत असले तरी आहे कठीण कारण हँड पंप आणि बोरवेल चे ९७ टक्के पाणी शेती करिता आणि ३ टक्के पाणी घरघुती कामा करिता, प्यायला आणि जनावरां करिता गावकरी वापरायचे. अशा प्रकारे आधी हँड पंप आटायचे नंतर बोरवेल.

नीरी ने केलेल्या सगळ्याच कामाचा लेखाजोखा इथे माडता येणार नाही पण त्यांनी केलेली सगळी कामे मग ती पर्यावरणाच्या संबधित असो किवा पाण्या संबधित , त्यांनी देशा करिता दिलेल्या सेवेचा , निश्चितच फायदा आपल्याला झाला आहे आणि भविष्यात पण त्यांच्या या पर्यावरण आणि अभियांत्रिकी संशोधनाचा फायदा या देशाला उपयुक्त ठरेल असे गृहीत धरायला हरकत नाही.

श्री. विनोद हांडे, नागपूर, मो : ९४२३६७७७९५

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading