मरणासन्न नद्या आणि आपण - (भाग - 2)

Submitted by Hindi on Tue, 01/12/2016 - 15:30
Printer Friendly, PDF & Email
Source
जल संवाद

आता काय पाहिले हे थोडसे तुम्हाला सांगायचय. खर सांगायच तर आपल्या सगळ्या नद्या ज्यांना आत्तापर्यंत आपण किंवा अजूनही आपल्या मनात त्यांना आपण देवता, माता मानतो पण त्या देवता, माता मनात जरी असल्या तरी प्रत्यक्षात राहीलेल्या नाहीयेत. केवळ गटारी झालेल्या आहेत. केवळ गटारी. म्हणजे तुमची औरंगाबाद मधून वाहणारी खाम असेल किंवा नाशिकमधून वाहणारी गोदावरी असेल, कोल्हापूरातील पंचगंगा असो किंवा चंद्रपूरची झरपट असो किंवा इराही असो. सगळ्या नद्या, एकजात सगळ्या नद्या हाताच्या बोटावर मोजण्यासारखे प्रवाह सोडले तर सगळ्या नद्यांची गटारे झालेली आहेत.

आता काय पाहिले हे थोडसे तुम्हाला सांगायचय. खर सांगायच तर आपल्या सगळ्या नद्या ज्यांना आत्तापर्यंत आपण किंवा अजूनही आपल्या मनात त्यांना आपण देवता, माता मानतो पण त्या देवता, माता मनात जरी असल्या तरी प्रत्यक्षात राहीलेल्या नाहीयेत. केवळ गटारी झालेल्या आहेत. केवळ गटारी. म्हणजे तुमची औरंगाबाद मधून वाहणारी खाम असेल किंवा नाशिकमधून वाहणारी गोदावरी असेल, कोल्हापूरातील पंचगंगा असो किंवा चंद्रपूरची झरपट असो किंवा इराही असो. सगळ्या नद्या, एकजात सगळ्या नद्या हाताच्या बोटावर मोजण्यासारखे प्रवाह सोडले तर सगळ्या नद्यांची गटारे झालेली आहेत. इतक्या वाईट अवस्थेत त्या नद्या आलेल्या आहेत की आपल्याला त्या नद्या आता दुरुस्त होतील का याची सुध्दा चिंता भेडसावी इतक्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत.

याला वेगवेगळी कारणेसुध्दा आहेत. काय काय कारणे आहेत? तर कारखान्यांपासून ते आपल्यापर्यंत सगळेचजण आपण या नद्यांच्या अवस्थांमध्ये काँट्रीब्युट करतो. नद्या जितक्या घाण करता येतील तितक्या नद्या घाण करायला आपण हातभार लावतो. म्हणजे छोटस स्टॅटीस्टीक्स आहे की महाराष्ट्रामध्ये जी काही शहरं आहेत ती शहरं स्वत:साठी पाणी कस मिळेल याची चिंता करतात, स्वत:ला जास्तीतजास्त पाणी मिळाव याच्यासाठी वाट्टेल ते करतात, वाट्टेल तो दबाव आणतात पण आपण निर्माण केलेली घाण ही नदीत जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी शून्य प्रयत्न करतात. याचे एक साधे उदाहरण आहे, सरकारी आकडेवारीच सांगते की महापालिकेंच्या हद्दीमध्ये, राज्यात तेवीस महापालिका आहेत, महापालिकांच्या हद्दींमध्ये जे काही वेस्ट वॉटर निर्माण होत त्याच्यातले केवळ सोळा टक्के पाणी हे ट्रीट होते आणि उरलेल चौऱ्यांशी टक्के पाणी हे तसेच सोडले जात, अर्थात ते कुठ जाणार, तर नदीला जाणार, आणि ते नदीत गेले तर नदीची काय अवस्था होणार याची कल्पना किंवा याचे वेगळ काही सांगायला नको. हे जस महापालिकांच आहे, मोठ्या शहरांच आहे तसेच छोट्या शहरांचेसुध्दा आहे, नगरपालिकांच.

नगरपालिकांमध्ये तर केवळ 1 टक्का इतकीच क्षमता आहे नद्या यांच पाणी ट्रीट करण्याची. प्रत्यक्ष क्षमता, असलेली क्षमता आणि प्रत्यक्ष होणारी ट्रीटमेंट, प्रत्यक्ष होणारे काम याच्यात काय तफावत असते हे खर तर आपल्याला सांगायला नको तर, किती पाणी ट्रीट होत असेल आणि किती पाणी तसेच नद्यांना मिळत असेल याच्यावरून आपल्याला अंदाज येतो. त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये तुम्हाला मानवी विष्ठा, कारखान्यातून येणारे अतिशय घातक रासायनिक पदार्थ, सर्व प्रकारचा कचरा, सर्व प्रकारच्या शेतीमध्ये वापरलेली कीटक नाशके, रासायनिक खते यांचे सर्व घातक औषध तिथपासून ते आपण जो काही आपला खारीचा वाटा त्यात बिघडवण्यासाठी उचलत आहोत त्या सगळ्या गोष्टी नद्यांमध्ये पाहायला मिळतात. आता हे सगळ होताना एक खूप वेगळ्या प्रकारची विषमता नद्या खराब होत असल्यामुळे निर्माण होते. याच्याकडे लक्ष द्यायला खरच कुठल्याही नेतृत्वाला वेळ नाहीये, किंवा कोणाला त्याचे काही पडलेले नाहीये.

काय होत की जी शहरे श्रीमंत आहेत, ज्या शहरांची क्षमता आहे, ज्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे ती शहरे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदुषण करताहेत आणि त्यांच निर्माण होणार जे वेस्ट आहे, त्यांच निर्माण होणार जे प्रदूषित घटक आहेत ते तसेच्या तसे नदीत सोडून देतात. याचे परिणाम जी गाव डाऊन स्ट्रीम ला असतात आणि त्यांच्याकडे पाणी शुध्द करण्यासाठी तुरटी विकत घेण्याचीसुध्दा आर्थिक क्षमता नाहीये अशा गावांना याचा फटका बसतो. सांगलीचे उदाहरण घ्या म्हणून सांगलीचे उदाहरण घेचले. सांगलीत भिंतीच्या एका बाजुला कृष्णा वाहतेय, भिंतीच्या दुसऱ्या बाजुला नाला वाहतोय. भिंत बांधलीय अत्यंत चांगल काम केलय कारण त्यातून नदीत ते पाणी मिसळायला नको. पण कुठपर्यंत आहे ? जीथे सांगलीची हद्द आहे तिथपर्यत ती भिंत आहे, तिथपर्यंत कृष्णेच पाणी सांगलीच्या प्रदुषणापसून मुक्त आहे. पण जिथे ही हद्द संपते, तिथे भिंतही संपते आणि मग नदी, आणि तो नाला त्यातल घाण पाणी एक होते आणि पुढच्या गावांना जाते.

म्हणजे आम्हाला आमची काळजी घ्यायचीय, पण घाणीमुळे, आमच्याच प्रदूषित घटकांमुळे पुढच्यांच काय होतय याच आम्हाला काही देण-घेण नाहीये. हे केवळ सांगलीमध्ये नाहीये. हे प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कमी प्रमाणात, जास्त प्रमाणात, या रुपात, त्या रुपात, इचलकरंजीचे उदाहरण तर आणखीन वेगळे आहे. म्हणजे कधी कधी याची गंमतही वाटते, पण त्या गंमतीमुळे इतर गावांचे काय हाल होतात याचा अंदाजसुध्दा येतो. इचलकरंजी काय करते, इचलकरंजीच्या बाजुने पंचगंगा वाहते, पंचगंगाच्या काठावरचे गाव, ज्याला आपण महाराष्ट्रातल मँचेस्टर म्हणतो, वस्त्रोगासाठी अत्यंत महत्वाचे गाव. पण वस्त्रोगासाठी महत्वाच असल तरीसुध्दा तितक्याच मोठ्या प्रमाणात प्रदूषण, अतिशय घातक प्रदुषण करणार नगर, शहर म्हणूयात. पंचगंगेच्या काठावर असूनही हे गाव पंचगंगेच पाणी स्वत: वापरण्यासाठी उचलत नाही कारण काय तर पंचगंगेचे पाणी प्रदूषित. वरती कोल्हापूर आहे, अनेक साखर कारखाने आहेत, काही डिस्टीलरीज आहेत, इतर उद्योग आहेत, त्याची सगळी वेस्ट पंचगंगेत येते आणि पंचगंगेतून वाहात वाहात ते इचलकरंजीपर्यंत येते. त्यांच कारण योग्य आहे की आम्हाला जर प्रदूषित पाणी असेल तर आम्ही वापरु कशासाठी. त्यामुळे 15-20 किलोमीटर अंतरावर असलेले कृष्णेच पाणी उचलतात त्याच्यासाठी वेगळा खर्च करतात आणि ते पाणी वापरतात.

पण दुदैव अस की ते पाणी वापरल्यानंतर आम्ही जी काही घाण निर्माण करतो, ती पुन्हा पंचगंगेत टाकतो आणि आधीच घाण असलेली पंचगंगा आणखीन घाण करुन ती पुढच्या गावांकडे पाठवतो. म्हणजे ते सगळ बघीतल आणि खाली असलेल्या गावांमधल्या लोकांना भेटलो. त्या लोकांना काहीच वाटत नाही कारण ते रोजच भोगताहेत, आपल्या डोळ्यात अक्षरश: पाणी येतं. ज्यांची क्षमता नाही त्यांना आपण अशा प्रकारचे पाणी पाठवतो आणि आमची आर्थिक क्षमता असूनसुध्दा आम्हाला ते पाणी थोडसतरी ट्रीट कराव, थोडस बरं करुन पाठवाव हे वाटत नाही, हे कुणीही करत नाही, हे कुणीही पाळत नाही. अशा पध्दतीने विषमता वाढते याच्याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. या सगळ्याला जबाबदार कोण आहे ? या सगळ्या प्रदुषणाला, तर जस मी सांगितल की पालिका आहे, महापालिका आहे, कारखाने आहेत, आजही इतके आपल्याकडे कागदोपत्री कडक नियम असूनसुध्दा कुठल्याही कारखान्याला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता, कुठल्याही इंड्स्ट्रीजना कुणाचीही फिकीर नाही.

ते कोगदोपत्री दाखवतील आम्ही पोल्युशन फ्री आहोत, आम्ही सगळ ट्रीट करुन सोडतो, पण आमच्या प्रकल्पातून एक थेंबही पाणी नदीकडे जात नाही. पण प्रत्यक्षात रात्रीच्यावेळी काय घडतं? पावसाळ्यात काय घडते हे जाऊन पाहीले तर हे काय बोलतात आणि काय करतात हे आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत बेफिकीर आणि कोणाची काळजी सोडा कोणाची फिकीर नाही अशा पध्दतीने हे सगळे चालते. जसे पालिका करताहेत, कारखाने करताहेत शेतीमधून खूप मोठ्या प्रमाणात घटकसुध्दा तेथे जाताहेत, त्याच प्रमाणे तुम्ही आणि मीसुध्दा, आपणसुध्दा देवाच्या नावाखाली जे काही करतो ते सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आमच्याकडे भोवताल नावाचे एक पान लोकसत्तामध्ये आम्ही चालवतो. प्रदूषण, पर्यावरण, हवामन या विषयावर. मागच्याच मंगळवारच्या भोवतालला सांगलीचे एक प्राध्यापक आहेत त्यांचे एक पत्र आले होते.

गणेश उत्सवात जे काही वेस्ट, जे काही निर्माल्य, जे काही मूर्तींच्या माध्यमातून हेवी मेटल्स, किंवा प्रदूषित घटके रंग हे जात असतील तर त्याच्यामुळे कृष्णा किती प्रदूषित होते? त्यांनी त्या पूर्ण समीकरणासह आकडेवारी देऊन मांडली. जवळजवळ दिडपट-दूप्पट प्रदूषण त्या काळात आपल्याला पाहायला मिळत जर आपण देवाच्या नावाखाली देवतेसमान नदीला जर असे करणार असेल तर ती सुधारणार कशी ? याचीच सर्व गोष्टींवर नदी प्रदूषित होणे याच्याच सर्व गोष्टींवर परिणाम होताहेत. त्यातल अत्यंत महत्वाचा परिणाम म्हणजे बायोडाव्हर्सीटीवर, जैवविविधतेवर होणारा परिणाम. हा जैवविविधतेवर होणारा परिणाम वेगवेगळे सायंटीस्ट्स, अभ्यासक मांडत असतीलच पण त्याचा परिणाम तिथ जगणाऱ्या, त्या काठावर राहणाऱ्या माणसावर काय होतोय त्याच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न केला. तेव्हा तेरवाडच्या ठिकाणी पंचगंगेच्या किनाऱ्यावर काही मासेमार त्यांच्याशी बोलताना जे काही सांगितल ते येथे मांडलेल आहे. काय सांगितल त्या मच्छीमारांन ?

साधारण 55-56 वयाच्या 10-12 वर्षांपासून मासेमारी करतोय आणि त्याने सांगितलेला अनुभव इथ तुम्हाला सांगतो. त्यानी काय सांगितल की दहा वर्षांपूर्वी पंचगंगा या नदीत तेरवाड या ठिकाणी, त्या ठिकाणानंतर पंचगंगाही कृष्णेला जाऊन मिळते, जवळ जवळ 15-20 जातीचे मासेच दिसायचे नदीमध्ये. पण आज केवळ एक मासा उरलाय तो म्हणजे डुक्कर मासा. डुक्कर मासा तुम्हाला नाव कदाचित नवीन वाटेल. पण चिलाप या तिलापी किंवा चिलापी हा जो मासा बाहेरुन इंट्रोड्युस केला त्याला ते लोक डुक्कर मासा म्हणतात. कारण काय तर तो मासा कितीही घाण पाण्यात राहू शकतो. तो मासा आहे आणि इतर मासे नाहीत इट इज अॅन इंडिकेशन ऑफ अत्यंत घाणेरडी नदी. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने तो डुक्कर मासा. अतिशय चपखल आणि योग्य नाव. तर ते म्हणाले फक्त आम्हाला डुक्कर मासा मिळतो बाकी कुठलेही मासे मिळत नाहीत. त्याचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तो कसा तर 15-20 वर्षांपूर्वी जेंव्हा भरपूर मासे होते तेंव्हा त्यांना रोजचे 15-20 वर्षांपूर्वी म्हणजे नाइंटीज मधली, अर्ली नाइंटीज मधली गोष्ट, तेंव्हा 100 रुपये रोजची कमाई होती मासेमारीची. आज केवळ 20-30 रूपये मिळतात.

कस जगायच ? बायोडाव्हर्सीटीकल लॉस म्हणा, जैवविविधता नष्ट होण हे फक्त शास्त्राच्या पर्यावरणाच्या भाषेत एक झालेला लॉस नाहीएय. त्याचा अशा पध्दतीने आपल्यावरसुध्दा परिणाम होतोय. हे कुठेतरी लक्षात घेतल पाहिजे आणि हे घडतय, आणि हे त्यांच्याच शब्दात आपण ऐकतोय. अर्थात हे ज्या वेळेला त्याला विचारले तेंव्हा त्यानी त्याच क्षणी तिथ उभा असताना हे जे काही 15-20 मासे आहेत, हे जे लोकांना त्याच क्षणी ती सगळी नाव पटकन बोलून दाखविली. हा मासा तो मिळायचा, तो मिळायचा, तो मिळायचा, हि 15-20 नाव त्याच क्षणी सांगितली. आता हे जे काही त्यांनी सांगितल त्याला दुसऱ्या पध्दतीने पुष्टीसुध्दा मिळाली. ते म्हणजे शिवाजी विद्यापीठामध्ये पर्यावरण विभागात डॉ. जय सामंत, नाव आपण ऐकल असेल, त्यांनी 1956 ते 1986 या काळात पंचगंगेतल्या डाव्हर्सीटीत काय बदल झालाय याचा अभ्यास केलाय, त्या अभ्यासामध्ये त्यांना जी फॅक्ट दिसली तीच या माणसाने त्याच्या भाषेत सांगितली. त्यांना जे आढळले ते असे की या 30 वर्षांच्या काळात पंचगंगेतले 20 मासे तेथून नष्ट झालेले आहेत.

त्यामुळे या मासेमारांनी सांगितलेल कशा पध्दतीने आपल्याला अभ्यासाच्या रुपातसुध्दा पाहायला मिळालं. म्हणजे कशा पध्दतीने, किती झपाट्याने ही बायोडाव्हर्सीटी नष्ट होते याचे एक उदाहरणसुध्दा आणि ती नष्ट होताना लोकांच जीवनसुध्दा नष्ट होतय याचे उदाहरण. याचा जसा मासेमारांवर परिणाम होतोय तसा शेतीच्या अर्थव्यवस्थेवरसुध्दा खूप मोठा परिणाम होतोय. इतका मोठा की तिथे जाऊन बघीतल्याशिवाय, त्यांच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला हे लक्षात येणार नाही. गमतीशीर परिणाम म्हणजे त्याच्यात करुणासुध्दा आहे. पण अति करुणा होते तेंव्हा गंमत वाटते. अशा पध्दतीने मी गंमतीशीर म्हणतोय, गंमतीशीर परिणाम म्हणजे नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर द्राक्ष पिकतात, वाईन इंड्स्ट्री आहे, त्याचा खूप गाजावाजा केला जातो. पण नाशिकची गोदावरी आपणा सर्वांना माहित असते, पण तिला येऊन नाशिकमध्येच मिळणारी, नाशिकच्या एमआयडीसी मधून वाहणारी आणि पुढे गोदावरीला मिळणारी नासर्डी एक उपनदी आहे.

ती इतकी घाण झालेली आहे की त्या नासर्डीतल पाणी जे बागायतदार शेतीसाठी, द्राक्षांसाठी वापरतात त्यांच्या द्राक्षाची क्वॉलीटी घसरली आहे, वर दिसताना छान दिसतील पण आता त्यांची घसरलेली क्वॉलीटी ही लोकांना इतकी माहित झाली, व्यापारांना की त्या नासर्डीच्या पाण्यावर जे द्राक्ष घेतात त्यांच्या द्राक्षांना मार्केट मिळत नाही, आणि अशी काही आडनावे आहेत विधाते, निघट, निघळ असे 5-10 आडनावे आहेत त्या आडनावांचा माल आला तर स्थानिक मार्केटपासून दिल्लीच्या मार्केटपर्यंत घेतला जात नाही. प्रेफरंस दुसऱ्या मालाला दिला जातो, घ्यायचाच झाला तर यांना कमी भाव मिळतो. त्यामुळे अनेकांनी इतर ठिकाणी जरी द्राक्ष घेतली, विहीरीच्या पाण्यावर जरी द्राक्ष घेतली, नासर्डीच पाणी वापरल नाही तरी सुध्दा त्यांच्या आडनावामुळे त्यांचा माल हा ब्लॅकलिस्टेड अशा पध्दतीने केल्याचे अनुभवी लोक सांगतात.

त्यामुळे अनेकांनी थोडीशी चालाखी केली आहे, त्या आडनावाच्या ठिकाणी दुसर काहीतर गणेशग्रेप्स, काहीतर अमकच ग्रेप्स अस म्हणून ते विकतात. म्हणजे किती परिणाम होऊ शकतो. प्रदूषणाचा,अर्थव्यवस्थेवर त्यांच्या जगण्यावर हे ह्याच्यातून दिसत. तसे सगळी मोठी शहरे, पुणे नागपूर हे दोन उदाहरण म्हणून मी फक्त इथे मांडलीत. त्यांच्या डाऊनस्ट्रिमला जिथे भाजीपाला केला जातो, मला आठवते मी पुण्याचा असल्यामुळे आमच्याकडे मांजरी, मुंडवा या भागात नदीच्या खालच्या भागात भाजीपाला केला जातो. हडपसरची मांजरीची भाजी म्हंटल की लोक घेत नाहीत. याचे कारण आपलीच घाण तिथे गेली आणि भाज्या कशा असतील, दिसायला टवटवीत दिसल्या तरी त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे याची मात्र चिंता किंवा हे मात्र लोकांना कळत. अशा पध्दतीनेसुध्दा आर्थिक परिणाम त्यांच्या मार्केटवर होत असतो. हे होणे का साहाजिक आहे कारण ठिकठिकाणी ह्याच्याबद्दलचा अभ्यास झालेला आहे.

म्हणजे सिना नदीत जे काही प्रदूषित घटक आहेत त्यांचा अभ्यास झाला आहे, त्याच्यामध्ये भाज्यांमध्ये खपू मोठ्या प्रमाणात, लक्षणीय प्रमाणात, हे प्रमाण कमी असेल पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लक्षणीय प्रमाणात त्याच्यात जड धातु असलेले पाहायला मिळाले. हेच खाम नदीबद्दल आत्ता झालय. तिथेसुध्दा हे आढळेल. म्हणजे लोकांना याच्यामुळे त्रास होणार हे निश्चित आहे, त्यामुळे या लोकांवर या प्रदूषणाचा निश्चितच फटका बसणार किंवा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार. जसा प्रदूषणामुळे लोकांना फटका बसलेला आहे तसाच नद्या कोरड्या होण्यामुळेसुध्दा. ह्या नद्या जितक्या कोरड्या होत गेल्यात तितक्या प्रमाणात लोकांची अर्थव्यवस्था, विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतीवर आधारित असणाऱ्या लोकांच्या अर्थव्यवस्था ही खूप मोठ्या प्रमाणात ढासळायला हातभार लागलेला आहे.

या 15-20 वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांना नदीचे ट्रान्सफर्मेशन पाहिलेले आहे, 15-20 वर्षांपूर्वी नद्या बऱ्यापैकी वाहायच्या. ज्या नद्या 15-20 वर्षांपूर्वी अगदी एप्रिल-मे पर्यंत उन्हाळा संपेपर्यंत वाहायच्या, त्या नद्या आज हिवाळा संपताच किंवा हिवाळा सुरु असतानाच डिसेंबर-जानेवारीला घरघर सुरु होते आणि नद्या पूर्णपणे आटतात. पण त्याच परिणाम काय झालाय तर कोरड्या नद्या झाल्या आणि शेतकरीसुध्दा दरिद्री होत गेले. हा संबंध पाहिला जात नाही, हा संबंध किती घट्ट आहे याच्याकडे लक्ष दिले जात नाही पण हा संबंध आहे. परभणी जिल्ह्यामध्ये पालम तालुका, त्याच्यामधल्या काही शेतकऱ्यांना भेटलो, त्यांच्या बरोबर फिरत असताना त्यांनी अत्यंत साध्या शब्दात, कुठलीही टेक्नीकल, सायंटीफिक लँग्वेज न वापरता, अत्यंत साध्या शब्दात हा संबंध सांगितला. ते म्हणाले नदी आटली तशी आमची गावं दरिद्री होत गेली.

म्हंटल नदी आटण्याचा आणि गाव दरिद्री होण्याचा काय संबंध ? संबंध आहे पण इतका ? अगदी साध्या शब्दात त्यांनी सांगितल. नदी नाही पाणी नाही, पाणी नाही - आमच्या विहिरींना पाणी नाही, आमच्या विहिरींना पाणी नाही, नदीला पाणी नाही, आमच्याकडे जनावरांना चारा नाही. चारा नाही - आमच्याकडे जनावर नाहीत. जनावर नाहीत - आमच्याकडे दूध नाही, दूध नाही - आमच्याकडे रोजचा मिळणारा 10-15-20 रुपयांचा रोजचा खेळता पैसा नाही, आज 15-20 रुपये आपल्यासाठी किरकोळ, नाममात्र असतील पण त्यांच्याही संसार चालवायला, त्यांचा डे-टू-डे गरजा भागवण्यासाठी त्यांच्या अत्यंत गरजेची कमाई आहे. जेे खूप मोठ्ठ अॅसेट आहे. तेच नाहीये. शिवाय जनावर नाहीये, खत नाही, अशा सगळ्या याच्यामध्ये नदी आटण आणि त्यांच्या व्यवस्थेवर, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्यांच्या जगण्यावर थेट परिणाम होणार म्हणजे काय हे पाहायला मिळत. जस हे छोट्या शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे तसच संत्र्याचे बागायतदार असतील, द्राक्ष बागायतदार असतील त्यांच्यावरसुध्दा हा परिणाम झालेला आहे. अमरावती जिल्ह्यातला वरुड जो भाग आहे तो संत्र्यांसाठीचा अतिशय प्रसिध्द भाग आहे.

तिथे जी संत्री येतात ती संत्री येण, किंवा कितीप्रमाणात ती सगळ पिकविण याचा आणि तिथली चुडामण नावाची नदी हा वाहाण्याचा खूप जवळचा संबंध आहे. हा इथून लक्षात येत की इतक्या लोकांशी बोलताना लक्षात येत, त्या लोकांनी सांगितलेल, तिथल्या बागायतदार लोकांनी सांगितलेला मुद्दा असा, निरिक्षण असे की जेंव्हा चुडामण वाहते तेंव्हा आमच्या विहिरींना, आमच्या बोअरवेल्सना पाणी असत, पण आता चुडामण वाहायची थांबली आहे. पावसाळ्यामध्ये कधीतरी वाहते, त्यामुळे तेवढा रीचार्ज जो अपेक्षित असतो तेवढा तो होत नाही, भूजलाचे पुनर्भरण होत नाही, आमच्या विहिरी भरत नाहीयेत, आमच्या बोअरवेल्सना पाणी नाहीये. त्यामुळे तिथल्या काठावरच्या एका सरपंचाशी बोललो, अत्यंत सधन बागायतदार, दोन हजार झाडांची बाग त्यांची. पण मागच्या दोनतीन वर्षामध्ये त्यांनी ती दोन हजार झाडांची बाग सहाशे झाडांवर आणली. कारण काय पाणी नाही. का पाणी नाही नदी वाहात नाही, म्हणजे नद्या कोरड्या पडण हे इतक्या प्रमाणात, आता त्यांची दोन हजार झाडांपैकी सहाशेच झाड राहीली त्याचा एकॉनॉमीवर काय परिणाम झालाय याचा आपणांस अंदाज येऊ शकतो. हेच नाशिकमध्ये घडलय.

नाशिकमध्ये पिंपळनंर परिसरात द्राक्ष बागायतदार आहेत. एक भालेराव म्हणून कृषीरत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्याशी बोलत असताना ते कागदावरती हिशोबच मांडत असतात. जेंव्हा आमची नदी वाहात असते किंवा जेंव्हा आम्हाला पाणी सोडलं जात आणि जेंव्हा पाणी सोडलं जात नाही. एकरी, व्यवस्थीत हिशोब मांडून सांगतात एकरी 15,000 रुपये नुकसान होत. आणि असे 15,000 रुपये जास्त मिळतात. इतक्या प्रमाणात याचा अर्थव्यवस्थेवर मग तो अगदी साधा गाई, म्हशी पाळून त्या दूधावर रोजची रोजीरोटी भागविणारा शेतकरी असेल किंवा सधन बागायतदार असेल, त्यांच्या सगळ्यांच्या अर्थव्यवस्थेवर नद्या कोरड्या होऊन आटणं याचा परिणाम झाला. नद्या आटल्यास खूप मोठ संकट येत. आपल्याला अंदाज येत नाही की मासेमारांच काय झालय? आणि तस पाहायला गेल तर लक्षणीय संख्येने मासेमार आहेत. एकत्र नाहीयेत, संघटीत नाहीयेत. त्यामुळे अंदाज येत नाही.

पण हजारो फॅमीलीज आहेत. हजारो फॅमीलीज याच्यावर जगतात पण नदीच प्रदूषण आणि नदी न वाहन्यामुळे ते पूर्णपणे देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत. अनेक लागल्यासुध्दा आहेत. दुसरा स्त्रोत जगण्याचा नाहीचेय. परंपरागत त्या व्यवसायामुळे शिक्षणाकडे फारसे लक्ष नाही, जमिनी प्रत्येकाच्या असतील अस नाही पण आमच अॅसेट काय होत की नदी, नदीतलं पाणी, पाण्यातले मासे. ते इतक्या विपूल प्रमाणात होते की इतर काही करण्याची गरज नव्हती. व्यवस्थीत सगळ चालायच. आज जर आमचे अॅसेटच काढून घेतले, अॅसेटच जर संपल्या तर आम्ही जगणार कसं? अशा पध्दतीच त्यांचे सगळ जीवन किंवा संपूर्ण राहणीमान धोक्यात आलेल आहे. हे जस प्रदूषणामुळ, नद्या कोरड्या होण्यामुळ घडल तसच एक अत्यंत महत्वाची बाब, तशात पर्यावरणात अभ्यास करणारे लोक हे जाणून असतात पण सामांन्यांना त्याची फारशी माहिती नसते ते म्हणजे नदीच --- टोक जे आहे नदी आणि जमिन यांचा काहीतरी संबंध येतो, ती जी दलदलीची जागा आहे , झुडपे वाढलेली असतात, गचाळ असत सगळ, त्या भागात जाऊ नका, साप असतील, वारुळ असतील अस सांगितले जात. ह्या ज्या जागा आहेत त्या जागा आता पूर्णपणे नष्ट व्हायला लागलेत. आणि तेच माशांसाठी अत्यंत उत्तम ब्रीडीग ग्राउंड्स आहेत.

त्याच ठिकाणी येऊन मासे किंवा इतर जीव पिलांना जन्म देतात, अंडी घालतात जे काय असेल ते आणि तोच जर भाग राहिला नाही तर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला त्यांच्या प्रजननावर परिणाम झालेला दिसतो. आज मातीसाठी, ते सगळ साफ करण्यासाठी किंवा नदीमध्ये आम्हाला शेती वाढवायची आहे म्हणून इतर पध्दतीच्या एंक्रोचमेंट साठी एकोटोन जवळजवळ नष्ट झालेले आहेत. साहाजिकच त्याचा माशांच्या संख्येवर आणि त्यांच्या पुनरुत्पादनावर परिणाम होणार. तो परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा फटका हा सगळा मासेमारांना आणि त्याच्यावर जगणाऱ्या त्याच्या कुटुंबावर झालेला आपणास पाहावयास मिळतो. अगदी छोटी बाब. डांंगरवाडी जसे मासेमार नदीवर जगतात तसाच मासेमार किंवा इतर काही समाज आहे जो नदीच्या पात्रावर जगतो. नदीच्या पात्रामध्ये उन्हाळ्यामध्ये जेंव्हा पात्र कोरड होत तेंव्हा त्या वाळुमध्ये कलिंगड, काकड्या, भाजीपाला घेणारे शेकडो, हजारो कुटुंब आहेत महाराष्ट्रभर.

पण आज नद्या लवकर आटत असल्यामुळे त्याच्यात ओल राहात नाही, वाळूत ओल राहात नाही, प्रदूषणामुळेसुध्दा खूप मोठ्या प्रमाणात जेंव्हा ते डांगरवाडी लावतात तेंव्हा त्यांच नुकसान झालेल पाहायला मिळत. अमरावतीची पेढी नदी अमरावतीच्या खालून वाहते, भातकुली नावाच गांव. त्या भातकुलीमधून वाहणारी पेढी एक अरुणभाई शेख म्हणून, तो डांगरवाडी घेणारा, त्याच्याशी बोलताना त्याने सांगितलेला अनुभव तर अगदी विषण्ण करणारा होता. म्हणाला की आता एक तर आम्हाला डांगरवाडी घेता येत नाही, कारण काय तर नद्या लवकर आटतात, आणि घेतली तर अमरावतीमुळे आमच नुकसान होत. कारण अमरावतीमधून वाहणारा जो अंबा नाला आहे पूर्वी त्याला नदी म्हणायचे, आता नाला म्हणतात, तो अंबा नाला जेंव्हा पाऊस पडतो किंवा जेंव्हा त्याला पाणी येत, ही सगळी घाण ही त्या पेढी नदी जाते, पेढी नदीला तो नाला येऊन मिळतो, आणि पेढी नदी तिथून जसजशी पुढे पुढे वाहते तशा काठावरच्या सगळ्या डांगरवाड्या ह्या प्राथमिक नष्ट होऊन जातात. म्हणजे कोणाकोणावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोय हे जर आपण शोधत गेलो, हिशोब करत गेलो तर त्याची यादी इतकी मोठी होते की आपल्याला तेंव्हा कळतं की हे संकट हे वरवर जर आपण विचार करतो की किंवा वरवर आपल्याला जे वाटतं त्याच्यापेक्षा कितीतरी भीषण असतं आणि तेच हे लोक ते अनुभवताहेत आणि हे लोक त्याचा फटका सहन करताहेत.

त्याचा जसा शेतीवर परिणाम झालाय, मासेमारीवर परिणाम झालाय डांगरवाड्यांवर परिणाम झालाय तसा आरोग्यावरसुध्दा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. कुठल्याही शहरांच्या खालच्या बाजुला असलेल्या गावांमध्ये कावीळीची साथ हमकास असते, कुठल्याही ऋतुत जी हगवणीची साथ असते, कुठल्याही ऋतुत जी या परजीवीमुळे, डासांमुळे किंवा इतर गोष्टींमुळे जे काही रोग पसरतात मलेरिया असेल किंवा इतर रोग असतील त्याच्या साथी हमखास असतात. आणि या सगळ्याला हे जे काही वरुन आपण प्रदूषण करतो, तेच जबाबदार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर आरोग्याचे नुकसान होत असेल तर या गोष्टींकडे लक्ष देणार का ? हा प्रश्न अजूनही तसाच आहे आणि तो पुढे किती काळ तसा राहील आत्तातरी त्याच उत्तर आपल्याकडे नाही. इथेच हे प्रश्न संपत नाहीत तर.

नांदेडला गेलो तेंव्हा गोदावरीच्या किनारी फिरत असताना दिसले की काही कामं चालली होती, गुरुता गद्दी कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण चालू होतं, पण नांदेड शहराच्या थोडस खाली गेल्यावर तिथ ज्या नदीच्या पात्रात उतरलो, नदीच्या पात्रात उतरत असताना धक्का बसावा इथपर्यंत नदीचे पात्र खणून टाकले होते. किंवा त्याचे काठ पूर्णपणे नष्ट केले होते. कारण काय तर विटांसाठी माती घेतली जाते. विटांसाठी माती घेण, त्याच्यासाठी काठ नष्ट करण हे इतक्या मोठ्या प्रमाणात होतय की आता गोदावरी असेल किंवा इतर नद्यांची पात्र ही विस्तारली नाहीत आणि त्यांचे पूर आत्ता जेवढे नाहीत त्याच्यापेक्षा जास्त आले नाहीत, दिड पटीने वाढले नाहीत, खरच आश्चर्य आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळ चालू आहे आणि आता दुर्दैव अस की ज्या कोणाला हे काम द्यायच नाहीये त्याच्या हातात ते राहीलेल नाहीये. कारण जर लोक पुढचा आणि मागचा शेतकरी आणि त्याची जमीन माती काढण्यासाठी देत असेल तर माझी जमीन राहून उपयोगाच नसत. क्रमश:

Add new comment

This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.

6 + 8 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.

More From Author

Related Articles (Topic wise)

Related Articles (District wise)

About the author

Latest