भारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण

Submitted by Hindi on Tue, 01/09/2018 - 13:31
Printer Friendly, PDF & Email
Source
जलसंवाद, डिसेंबर, 2017

संपूर्ण वर्षभर पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या परिसरात वनस्पतींची व प्राण्यांची जैवविविधता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचे पर्यटन केंद्रही उभे झाले आहे. वसोटा, महारखोर व इंदावली यातीन बाजूंंनी एक नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले असल्यामुळे व चवथ्या बाजूला सरोवराचे संरक्षण मिळाल्यामुळे येथे एक वन्य प्राणी अभयारण्य तयार झाले आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधण्यात आलेले हे धरण हे महाराष्ट्रातील एक मोठे धरण होय. कराडहून चिपळूण कडे जाणार्‍या रस्त्याच्या उजव्या हाताला हे धरण आहे. वीज निर्मिती हे या धरणाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या धरणाला महाराष्ट्राची जीवनरेषा म्हणून संबोधले जाते. धरण बांधकामामुळे या ठिकाणी शिवसागर सरोवर तयार झाले असून ५० किलोमीटर लांबपर्यंत पाणी या धरणामध्ये जमा झाले आहे. या धरणामुळे १९२० मेगावॅट वीज निर्माण केली जात आहे.

हे धरण भूकंप प्रवण क्षेत्रात असल्यामुळे या धरणाबद्दल वाद निर्माण झाले होते. १९६७ साली या परिसरात एक मोठा भूकंपही झाला. या भूकंपामुळे धरणाला भेगाही पडल्या होत्या. त्यांची योग्य ती दुरुस्तीही करण्यात आली. धरण आजही दिमाखाने उभे आहे.

भूकंपाचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने व त्याचे अंदाज व्यक्त करण्यासाठी या परिसरात ७ किलोमीटर खोलीचे बोअर खोदण्याची एक एक महत्वाची महत्वाकांक्षी योजना आखण्यात आली. धरण प्रवण क्षेत्रांत होणारे भूकंप, त्यांची भूगर्भीय व रासायनिक कारणे यांचा सखोल अभ्यास या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे. हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून यात प्रामुख्याने भारतीय भूगर्भ शास्त्रज्ञ पायाभूत काम कऱणार आहेत. १९६७ साली जो भूकंप झाला होता त्याचेपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप जरी झाला तरी धरणाला कोणताही धोका नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

सह्याद्री डोंगराची खूप मोठी उंची ही या धरणासाठी जमेची बाजू आहे. उतार तीव्र असल्यामुळे अत्यंत कमी जागेत एवढी उंची प्राप्त झाली आहे. या उताराचा चार स्टेजेसला लाभ मिळालेला असून त्याप्रमाणे वीज मिर्मिती केंद्रे जमिनीच्या पोटात उभी करण्यात आली आहेत. या प्रत्येक स्टेजमधील पाणी कोळेश्‍वर धरणाकडे वळविण्यात आले असून तिथे पुन्हा वीज निर्मिती करुन पाणी अरबी समुद्रात सोडण्यात आले आहे. या साठी लेक टॅपिंगचा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे.

संपूर्ण वर्षभर पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या परिसरात वनस्पतींची व प्राण्यांची जैवविविधता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचे पर्यटन केंद्रही उभे झाले आहे. वसोटा, महारखोर व इंदावली यातीन बाजूंंनी एक नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले असल्यामुळे व चवथ्या बाजूला सरोवराचे संरक्षण मिळाल्यामुळे येथे एक वन्य प्राणी अभयारण्य तयार झाले आहे. यात वाघ, चित्ते, सांबर, हरणे, अजगर, विषारी सर्प, मोठ्या खारी यासारखे प्राणी आढळतात. विविध प्रकारचे पक्षीही इथे जमा झाले असून पक्षी निरिक्षक त्यांचा अभ्यास करण्यासाठी इथे गर्दी करीत असतात. वसोटा जंगलात एक ११७० साली बांधण्यात आलेला जुना किल्ला आहे. पर्यकटांसाठी तो किल्लाही एक आपर्षण ठरते. कोयनानगर पासून १० किलोमीटरवर असलेला ओझर्डा धबधबा हा येथील बर्‍याचशा धबधब्यापैकी एक मोठा धबधबा आहे.

Add new comment

This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.

4 + 11 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.

More From Author

Related Articles (Topic wise)

Related Articles (District wise)

About the author

नया ताजा