सिंहगड रोड क्लबचे प्रत्यक्ष कृती कार्यक्रम
विविध क्षेत्रातील जलसाक्षरता कार्यक्रमांची निर्मिती होत गेली. वॉटर बजेटींग हा पाणी नियोजनाचा सर्वात प्राथमिक, मूलभूत आणि शाश्वत टप्पा आहे... हे जनमानसावर बिंबवण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. रोटेरियन्स हे काम पुढे नेण्यास सतत उत्सुक असतात... आम्हाला या कामातून आत्मिक समाधान मिळतेच आणि स्वतःबद्दलचा अभिमानही वाटतो.
रोटरी क्लब, पुणे सिंहगड रोड हा विविध समाजोपयोगी उपक्रम करणारा क्लब आहे. आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक, निराधार बालके, नवजात अर्भके इथपासून ते कार्पोरेट जगतातील सामाजिक समस्या अशा सर्व घटकांसाठी भरीव काम केले. पाण्यासाठी काम करणे तर या क्लबचे प्राथमिक उद्दिष्ट वाटावे अशा प्रकारे काम झालेले आहे. तीन चार प्रमुख उपक्रमांबद्दल इथे सविस्तर मांडणी करीत आहे.
1) सीसीटी (कंटीन्युअस कांटूर ट्रेंचिंग) नायफड भीमाशंकर जानेवारी 2012
भीमाशंकर जवळील खेड तालुक्यातील नायफड गावात रोटरी क्लब सिंहगड रोड व पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील युवक यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. बायफ या संस्थेने यासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे एक भव्य शिबीर नायफडला आयोजित केले गेले. यापैकी बराचसा खर्चाचा भाग, नियोजनाचा भाग रोटरीने उचलला. सकाळीच उठून मुले दुपारपर्यंत श्रमदान करीत असत. मग दुपारची विश्रांती आणि सायंकाळी उत्तम संस्कारित व्याख्यानांची मेजवानी .... यासाठी आयोजन व नियोजन रोटरीने केलेे. सात दिवसात जवळपास पाचशे मुलांनी उत्साहात श्रमदान करुन 30 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात चर खोदले. त्यात प्रत्येक पावसाचे पाणी अडवले गेले, जिरवले गेले. नायफड गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या तर सुटलीच तर खरीपाबरोबर रब्बी पिकांचे उत्पन्नही गावकर्यांना सुरु झाले.
2) विहीरीतील गाळ काढला : वांद्रे, मुळशी :
आमच्या क्लबने मुळशी तालुक्यातील धरणाच्या बॅक वॉटरला असलेले शेवटचे गाव उपक्रमासाठी निवडले. प्रेसिडेंट व इतर उत्साही मंडळीबरोबर आम्ही गावात पहिल्यांदा गेलो... विविध विषयांवर चर्चा होतच होती. आम्ही शिवारभर फिरत होतो... मे महिन्याच्या दुपारी... जाता जाता उत्तम दगडांचे बांधकाम असलेली विहीर जवळ जाऊन पाहिले तर ते जमिनीवर बांधलेले बांधकाम वाटत होते... विहीर असल्याची काही चिन्हे दिसत नव्हती....डोकावल्यावर अगदी जमीन लेव्हलला चिखल दिसत होता... पाणी....वगैरे विषयच नव्हता. बरीच चौकशी झाल्यावर मी घोषित केले की हा गाळ आपण काढू या.... विचारले किती खोल आहे ही विहीर... तर गावातील कुणालाही सांगता आले नाही... अगदी गावातील सर्वात वृद्ध माणसाला देखील.... म्हणजेच गेली 75-80 वर्षे या विहीरीत गाळ आहे आणि कुणीही काहीही विचार केलेेला नव्हता.
मग एक जोरदार भाषण ठोकले...गाळ काढण्याचा खर्च आम्ही करु आणि गावकर्यांनी श्रमदान करायचे.... गावातील एका सधन व्यक्तीनेही पैसै देवू केले...आणि...दुसर्याच दिवशी हालचाली होवून कामाला सुरवात झाली....बघता बघता विहीरीतला गाळ काढणे हे काम न होता तो गावासाठी उत्सव बनला....दहा अकरा दिवसात गाळ काढून झाला.... चांगली 30-35 फूट खोल होती विहीर... सुंदर चौकोनी.... उत्तम घडीव दगडांचे मंदीरासारखेच रेखीव बांधकाम....त्याला उतरण्यासाठी पायर्या....गावाला एक उत्तम शिल्प मिळाले होते... सात वर्षाच्या मुलापासून अठ्ठ्याहात्तर वर्षाच्या आजोबांपर्यंत सर्वांनी श्रमदानाचा आनंद लुटला होता... आणि पाणी.... 21 मे रोजी गाळ उपसून पूर्ण झाला... विहीर आतून मंदीराच्या गाभार्यासारखी स्वच्छ झाली... आणि मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ही विहीर अगदी गच्च भरली... जमीन लेव्हलला पॉटर टेबल होता.... हे गुप्तधन इतकी वर्षे चिखलात अडकून पडले होते.... त्या पाण्यावर तेव्हापासून तीन हंगामात पिके घेता येतात.... पावसाळ्या व्यतिरिक्त रब्बी आणि उन्हाळ्यातही शेती पिकते... किती क्षेत्र विचाराल तर.... 70 ते 80 एकर.... एकरी उत्पन्न प्रति हंगाम कमीतकमी 50 हजार रुपये. .. म्हणजेच 70 एकरात वर्षाकाठी एक लाख प्रति एकरच्या हिशोबाने रुपये 70 लाखाचे उत्पन्न सुरु झाले...गाळ काढण्याचा खर्च विचाराल तर ते फक्त 35000 रुपये आला.
3) वॉटर बजेटींग वर्कशॉप्स 2014 पासून :
एका ग्रामविकास करणार्या एनजीओ च्या ऑफसमध्ये वॉटर बजेट विषयीचा कागद पाहिला.... आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला....हे कागदावर न राहता.... सर्व सामान्यांना हे समजले पाहिजे... आणि सुरु झाला एक प्रवास....क्लबच्या निवडक मंडळीशी बोललो आणि सर्वांना कल्पना आवडली... व नेहेमी प्रमाणे.... सतीश... तुम चलो... हम तुम्हारे ....
त्या टेकनिकल पेपरचे मग सुटसुटीकरण झाले.... सोप्या भाषेत, विविध रकाने करत... सामान्य माणसांच्या साठीच्या पाण्याच्या अंदाजपत्रकाचा आराखडा तयार झाला.... मदत झाली बायफचे काकडेसाहेब, लुपिन फाउंडेशनचे बढेसाहेब आणि डब्ल्यूटीआर चे संदीप जाधव यांची....या सर्वांनीही आणि प्रकारच्या जलजागरणाची.... जल साक्षरतेची कल्पना उचलून धरली.
मग पुणे, नांदेड, कोल्हापूर, औरंगाबाद... या विद्यापीठातील एनएसएस चे विद्यार्थी यांच्या पासून सुरवात.... दोनअडीच तासांचा संवाद करीत चाललेला कार्यक्रम.... कार्यक्रमाचा मध्यवर्ती भाग वॉटर बजेटींगचा.... पण त्या निमित्ताने जलसाठवणूक, मायक्रोइरिगेशन, पिकांची पाण्याची नेमकी गरज, त्याची आकडेवारी सहित मांडणी, त्यातून साधे साधे हिशोब.... पण हे पाहून त्या विद्यार्थ्याचे विस्फरलेले डोळे... सगळंच खूप वेगळं..... प्रेरणादायी.... नवीन ... हमखास योजनेचं सूत्र सापडल्याचं साफल्य... हे सर्वकाही.... दौर्यावर दौरे निघत होते...बरेचसे रोटेरियन्स उत्सुकतेपोटी आणि सेवेसाठी म्हणून दौर्यात येत होते.
वॉटर बजेटींगची चर्चा सुरु झाली होती...क्लब.. डिस्ट्रीक्ट....आणि विद्यापीठ आणि युवक पातळीवर. बर्याच गावाहून बोलावणे यायला लागले...तिथे सामान्य ...अल्पशिक्षित पुरुष... महिलांनी स्वत:चे वॉबनवायला सुरवात केली. काही ठिकाणी व्यक्तीगत पातळीवर वॉटर बजेट करता येईल का, ते कसे करतात याची मागणी आली....मग त्यावरही मार्गदर्शन सुरु झाले...पुढे बराच प्रवास झालाय या उपक्रमाचा... त्यातून गेली तीन वर्षे आमचा क्लब यात काम करतोय....त्यातून माझ्या सारख्या कार्यकत्यार्ंना जीवन ध्येय मिळाल्यासारखे आहे... आणि विविध पातळीवरुन...विविध क्षेत्रातील जलसाक्षरता कार्यक्रमांची निर्मिती होत गेली. वॉटर बजेटींग हा पाणी नियोजनाचा सर्वात प्राथमिक, मूलभूत आणि शाश्वत टप्पा आहे... हे जनमानसावर बिंबवण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. रोटेरियन्स हे काम पुढे नेण्यास सतत उत्सुक असतात... आम्हाला या कामातून आत्मिक समाधान मिळतेच आणि स्वतःबद्दलचा अभिमानही वाटतो.
रो. सतीश खाडे, संचालक, 09823030218