भारतातीत सर्वात उंचावर बांधलेले धरण असा या धरणाचा लौकिक आहे. जगातही अशा प्रकारची उंचावर बांधलेली धरणे संख्येने बरीच कमी आहेत. उत्तराखंडात भागीरथी नदीवर तेहेरी येथे हे धरण बांधण्यात आलेले आहे. 2006 साली या धरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. सिंचन, नागरी पाणी पुरवठा आणि वीज निर्मिती या तिहेरी उद्देशाने हे धरण बांधण्यात आले आहे.

या धरणाची उंची 260 मिटर्स असून लांबी 575 मिटर्स आहे. पायाची रुंदी 1125 मिटर्स असून बंधा-याची जाडी 20 मिटर्स आहे. या धरणामुळे पाण्याचा साठा 4 घनकिलोमिटर्स असून क्षेत्रफळ हे 52 चौरस किलोमिटर्स आहे. या धरणाच्या पॉवर हाउस पासून निर्माण झालेली वीज उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, हरयाणा, जम्मूकाश्मीर, राजस्थान व हिमाचल प्रदेश या राज्यांना पुरविण्यात येत आहे. 2,70,000 हेक्टरला सिंचन क्षेत्राचा लाभ मिळतो. उत्तरप्रदेश, उत्तराखंड व दिल्ली उद्योग क्षेत्राला या धरणापासून पिण्याचे पाणी प्राप्त होते.
स्थानिक लोक व पर्यावरणवादी या धरणाच्या बांधकामावर खूप टीका करतात. हिमालय हा पर्वत कच्च्या खडकांसाठी प्रसिद्ध असतांना हे धरण का उभारण्यात आले हा त्यांचा सवाल आहे. या धरणापासून जो लाभ म़िळत आहे त्याच्या मानाने आलेला खर्च जवळपास दुप्पट आहे अशी या धरणावर टीका केली जाते. बांध नही चाहिये, बांध पहाडीका विनाश है असा नारा या धरणाच्या विरोधात लावला जात होता. निव्वळ कच्चा दगड हाच प्रश्न नसून हा प्रदेश भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो असेही म्हंटले जाते. भागीरथी नदी हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. या धरणामुळे नदीचे पावित्र्य झोक्यात आले आहे असे धर्ममार्तंड म्हणतात.
Posted by