चित्रकला स्पर्धा

15 Apr 2017
0 mins read

मी, पद्मजा लाखे रोटरी क्लब औंधची युवा सेवा शाखेची संचालिका आहे. मी डिस्ट्रिक्टच्या युवा सेवा विभागाचेही प्रतिनिधित्व करते. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्हाला जगातील पाणी समस्येची जाणीव आहे. देशातील सरकारी विभागांतर्फे व समाजसेवा संस्थांतर्फे या प्रश्‍नाची सोडवणूक करण्याचे प्रयत्न चालू आहेत. रोटरी या कामापासून अलिप्त राहू शकत नाही. मी आमच्या क्वलबच्या अध्यक्षांबरोबर व युवा टीमबरोबर चर्चा करुन 10वी पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यांना जलसाक्षर करण्याच्या उद्देशाने पाणी प्रश्‍नावर एक चित्रकला स्पर्धा घेण्याचे निश्‍चित केले.

या स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यासाठी ही स्पर्धा डिस्ट्रिक्ट पातळीवर घेण्याचे ठरविण्यात आले. डिस्ट्रिक्ट कडून आम्हाला भरघोस पाठिंबा मिळाला. या संदर्भात आम्ही एक कृती आराखडा तयार करुन डिस्ट्रिक्ट मधील क्लब, अध्यक्ष, Interact व रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला. आम्हाला सर्व अध्यक्षांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या गणेशोत्सवातही आम्ही अशीच स्पर्धा घेतली होती. पण या उत्सवात काही व्यक्तिगत जबाबदार्‍या असून सुद्धा आम्हाला त्वरित व सकारात़्मत प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेसाठी 30 क्लब्सकडून 3000 चे वर चित्रे प्राप्त झाली. चित्रांचा एकूण उत्कृष्ट दर्जा बघता त्यातून सुरवातीला 25 चित्रे निवडणे आम्हाला खूपच कठीण गेले. विद्यार्थ्यांनी चित्रांद्वारे दाखवलेल्या जाणीवा व सुचवलेले उपाय मनाला दंग करणारे होते. या 25 चित्रांमधून शेवटी बक्षिसासाठी 5 चित्रे निवडण्यात आली. परिक्षक म्हणून रोटेरियन पद्मजा लाखे, रोटेरियन अवलोकिता माने आणि रोटेरियन राजेश्‍वरी कार्ले यांनी काम पाहिले.

नंतर आम्ही स्पर्धेतील विजेते, त्यांचे पालक व शिक्षक यांना गौरविण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले. स्पर्धकांनी त्यांच्या कलाविष्काराने त्यांचे कलागुण व सामाजिक जाणीव यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. फेलोशिपमध्ये क्लबचे अध्यक्ष व स्पर्धक यांच्यातील संवाद बराच फलदायी ठरला. स्पर्धेत जमा झालेल्या चित्रांचा वापर ग्रिटींग कार्ड्स तयार करण्याचे मी ठरविले असून मला झालेला आनंद मी माझे मित्र व रोटेरियन्स बरोबर वाटू इच्छिते.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading