जलपुनर्भरणातून भूजल संवर्धन
संपूर्ण प्रोजेक्टचा खर्च काढण्यात येवून महाड रोटरी क्लब मधील सदस्यांच्या देणगीतून अंदाजपत्र तयार करण्यात आले. शाळेवरील उतरत्या छपरांचा योग्य वापर होवून पन्हाळ्यातील वाहणार्या पाण्याचे एका जागी नियमन करण्यात आले व प्लास्टिक पीव्हीसी पाईपचा वापर करण्यात आला. रोटे. श्री, सतीश खाडे यांच्या वेळोवेळी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनानुसार शाळा परिसर व बोअरवेल पर्यंत रूंद खड्डा खणून जमिनीअंतर्गत 7 पीव्हीसी पाईप टाकण्यात आले व बोअरवेलच्या जागी 5 मीटर परिघाचा रूंद व खोल खड्डा जेएसपी द्वारे खणण्यात आला.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 अंतर्गत कार्य करीत असलेल्या, रोटरी क्लब ऑफ महाड तर्फे 25 वर्षे अर्थात सिल्व्हर ज्युबिली (Silver Jubilee) इयरच्या पार्श्वभूमीवर डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऑफ वॉटर मॅनेजमेंट रोटे. श्री. सतीश खाडे ह्यांच्या मार्गदर्शन व सल्ल्यानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग (Rain Water Harvesting) हा प्रकल्प / प्रोजेक्ट करण्यात आला. ह्या करिता रोटरी महाड तर्फे टीम स्थापन करण्यात येवून रोटे. श्री. विजय पवार ह्यांच्या प्रोजेक्ट चेअरमनशीप अंतर्गत आखणी करण्यात आली.
कोकण परिसर हा मुसळधार पाऊस व अतिरिक्त पर्जन्यमान साठी ओळखला जातो. पण निसर्गत: जमिनीला जास्त उतार असल्यामुळे व नद्यांचे पात्र उथळ असल्यामुळे पाण्याचा साठा जास्त काळ न राहता उन्हाळ्यामध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवते. कोकण परिसर आर्थिक दृष्ट्या मागासलेला, कमी विकसित व दुर्गम आहे. ग्रामीण भागात ह्या सर्व समस्यांमुळे शाळांना विद्यार्थी / विद्यार्थिनींचा पट घसरू लागतो. पाण्याच्या दुर्भिक्ष व दुष्काळग्रस्त स्थितीमुळे पिके, जनावरे ह्या सर्वांवर अनिष्ट परिणाम घडतो.
रोटरी अध्यक्ष रोटे. डॉ. राहुल सुकाळे, सेक्रेटरी रोटे. श्री. राजीव वनारसे व प्रोजेक्ट चेअरमन रोटे. श्री. विजय पवार व टीम ह्यांनी महाड तालुक्याचा धावता दौरा करून प्रोजेक्टसाठी योग्य व गरजू शाळेची निवड केली. सेंट झेविअर स्कूल ह्या विस्तारलेल्या शाळेच्या परिसरामध्ये सुमारे 5 बोअरवेल उन्हाळ्यादरम्यान रिकाम्या रहात आहेत व शाळेतील सुमारे 1000 मुलांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते असे निदर्शनास आले. शाळेचे प्रिन्सिपॉल श्री. डिसोझा सर ह्यांच्या समवेत सर्व कमिटी मेंबर्स व रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर श्री. सतीश खाडे ह्यांनी मिटिंग घेवून त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट बद्दल सविस्तर माहिती दिली. प्रिन्सिपॉल श्री. डिसोझा सर यांच्या प्रोजेक्ट संदर्भात टेक्निकल माहिती रोटे. श्री. सतीश खाडे यांनी दिली. रोटे. श्री. सतीश खाडे ह्यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्वशैलीमध्ये अत्यंत सोप्या भाषेत प्रोजेक्ट बद्दल क्लब मेंबर्सना माहिती देवून मेंबर्समध्ये प्रोजेकट बद्दल उत्साह दुणावण्याचे काम केले.
संपूर्ण प्रोजेक्टचा खर्च काढण्यात येवून महाड रोटरी क्लब मधील सदस्यांच्या देणगीतून अंदाजपत्र तयार करण्यात आले. शाळेवरील उतरत्या छपरांचा योग्य वापर होवून पन्हाळ्यातील वाहणार्या पाण्याचे एका जागी नियमन करण्यात आले व प्लास्टिक पीव्हीसी पाईपचा वापर करण्यात आला. रोटे. श्री, सतीश खाडे यांच्या वेळोवेळी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनानुसार शाळा परिसर व बोअरवेल पर्यंत रूंद खड्डा खणून जमिनीअंतर्गत 7 पीव्हीसी पाईप टाकण्यात आले व बोअरवेलच्या जागी 5 मीटर परिघाचा रूंद व खोल खड्डा जेएसपी द्वारे खणण्यात आला. नैसर्गिक फिल्टरेशनच्या प्रयत्नानुसार बोअरच्या मुख्य जमिनीअंतर्गत पीव्हीसी पाईपला ड्रिलिंग करून असंख्य छोटी छिद्रे करण्यात आली व प्लास्टिक जाळीचे आवरण करून केवळ पाण्याचे सिंचन होईल याची काळजी घेण्यात आली.
पूर्ण खड्डा व वाळू, खडीचा योग्य प्रमाण वापरून भरण्यात आला व प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आला. सदरहू प्रोजेक्ट द्वारे पावसाळ्यात शाळेचा मोठा पृष्ठभाग असलेल्या छपरातून फुकट जाणार्या लाखो गॅलन पाण्याचे नियोजन करण्यात येवून भूपृष्ठाखाली खडकाच्या पोकळीत रेन वॉटर हार्वेस्टिंग यशस्वी प्रोजेक्ट अंतर्गत पाणी सोडण्याची किमया करण्यात आली. ह्याचा उपयोग केवळ शाळेतील 1 हजार विद्यार्थ्यांपूरता मर्यादित न राहता परिसरातील ग्रामीण भागातील इतर बोअरवेल व विहीरींना सुध्दा होत आहे.
सदरहू प्रोजेक्टचे औपचारिक उद्घाटन डी.जी. रोटे. प्रशांत देखमुख, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रोटे. सतीश खाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.