जलसंधारणासाठी क्षमता विकास

Submitted by Hindi on Sun, 04/16/2017 - 10:57
Source
जलसंवाद, मार्च 2017

आयटीआय (औंध) पुणे मधे 17 व 18 ऑक्टोबर 2013 ला घेतलेली कार्यशाळा


आमचे काम हे रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील जलसंवर्धन कार्यक्रमाचा एक भाग आहे. पुणे परिसरात विविध भागात हे जलसंवर्धनाचे काम चालू आहे. एकूण 32 क्लब या कामात सहभागी आहेत. जलसंवर्धनाचे एक पवित्र काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

नागरी भागात त्याचप्रमाणे ग्रामीण भागात भविष्यात पाण्याची चणचण निर्माण होणार हे लक्षात घेवून आमचे क्लबने जलपुनर्भऱणावर आपले लक्ष केंद्रित करायचे ठरविले. हे काम चांगल्या प्रकारे होण्यासाठी क्षमता विकास होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेवून औंध, पुणे येथील आयटीआय मधे शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी 17 व 18 ऑक्टोबर 2013 ला कार्यशाळा घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. या क्षेत्रात त्यांनी उद्योजक बनाावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

एनएसएसचे 200 विद्यार्थी व सिव्हील, ड्राफ्ट्समन, सर्व्हेअर, प्लंबिग अशा विविध शाखांमध्ये शिक्षण घेत असलेले 100 विद्यार्थी या कार्यशाळेसाठी निवडण्यात आले. त्यावेळी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर यांचे हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्य आदर्श गाव सम़ितीचे अध्यक्ष श्री. पोपटराव पवार हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते.

ही कार्यशाळा सहा सत्रांमध्ये घेण्यात आली. डॉ. दत्ता देशकर, श्री. दिलिप सातभाई, श्री. मिलिंद कुलकर्णी, श्री. व्हि.बी. गोखले, श्री. विश्‍वंभर चौधरी यासारखे त्या त्या क्षेत्रांत तज्ञ असलेले वक्ते निवडण्यात आले होते. पाषाण सूस रोडवरील पद्मविलास येथे सत्रे संपल्यानंतर प्रत्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमुळे निव्वळ प्रशिक्षण देण्यात आले नाही तर यापासून तरुणासाठी रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील याचाही विचार करण्यात आला.

कालदरी येथे घेण्यात आलेला जलसंवर्धन प्रकल्प (मो, 2017)


कालदरी ही ग्रामपंचायत असून पुरंदर तालुक्यातील 12 पाडे त्यात समाविष्ट आहेत. या परिसराची लोकसंख्या 1779 एवढी आहे. या परिसरात दरवर्षी 1100 मीमी पाऊस पडतो. असे असून सुद्धा दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाण्याचा तुटवडा जाणवायला सुरवात होते. टँकरने पाणी मागविणे हा तर आता येथे रिवाजच बनला आहे. सरकारी खर्चातून या ठिकाणी बरेच बंधारे बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण सध्या या सर्व बंधार्‍यांची अवस्था दयनीय आहे. यातील दोन बंधारे दुरुस्त करुन त्या खाली नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करुन जलसाठे वाढविणे याचा विचार सध्या आमचा क्लब करीत आहे. यामुळे या परिसरातील शेतीचे उत्पादन वाढून 1800 ग्रामस्थांना या योजनेचा लाभ होईल. रोटरी क्लब, पुणे (शनिवार वाडा), रोटरा क्लब, पुणे (कॅनटनमेंट) व सेवावर्धिनी हे आमचे या कामातील भागीदार आहेत.

आमचे काम हे रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील जलसंवर्धन कार्यक्रमाचा एक भाग आहे. पुणे परिसरात विविध भागात हे जलसंवर्धनाचे काम चालू आहे. एकूण 32 क्लब या कामात सहभागी आहेत. जलसंवर्धनाचे एक पवित्र काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

Disqus Comment