पाऊलवाटा - प्रकाश वाटा - भारतीय जलसंस्कृती मंडळ

8 Dec 2015
0 mins read

भारतीय जल संस्कृती मंडळ, धुळे शाखा यांच्या पुढाकारातून व शि.जि.प्र.संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहराच्या दक्षिणेस मुंबई आग्रा हायवेवर लंळीग घाटात दिवाणमळा ह्या छोट्याशा गावी गावातील लोकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये पाण्याबद्दलची जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने एक छोटेखानी पर्यावरण संरक्षणासंबंधीची कार्यशाळा करण्याचे व दोन गॅबियन पध्दतीचे बंधारे विद्यार्थी व ग्रामस्थांमार्फत बांधण्याचे ठरविण्यात आले.

भारतीय जल संस्कृती मंडळ, धुळे शाखा यांच्या पुढाकारातून व शि.जि.प्र.संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहराच्या दक्षिणेस मुंबई आग्रा हायवेवर लंळीग घाटात दिवाणमळा ह्या छोट्याशा गावी गावातील लोकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये पाण्याबद्दलची जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने एक छोटेखानी पर्यावरण संरक्षणासंबंधीची कार्यशाळा करण्याचे व दोन गॅबियन पध्दतीचे बंधारे विद्यार्थी व ग्रामस्थांमार्फत बांधण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार दि.23 फेब्रुवारी 2013 रोजी वरील संस्थेशिवाय देशबंधु मंजु गुप्ता फाऊंडेशन, धुळे महानगरपालिका, दिवाणमळा ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ, नवकार ग्रुप, धुळे ह्यांचा सक्रीय सहभाग लाभला. वरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यामागे काही उद्दिष्ट्ये ठरविण्यात आली होती.

1. पर्यावरण संरक्षण संबंधीची आवड व माहिती विद्यार्थ्यांपर्यंत व ग्रामस्थांपर्यंत पोहचवणे
2. बंधारा बांधण्याच्या कामात गावातील जनतेला व महाविद्यालयीन विद्याथर्यांना सहभागी करणे त्यामुळे त्यांना पण आपण काहीतरी करू शकतो अशी भावना रूजविणे
3. पाणी अडवा पाणी जिरवा हा महत्वाकांक्षी प्रकल्प ग्रामस्थांपर्यंत पोहचणे
4. दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करणे

वरील उद्दिष्ट्ये घेऊन भारतीय जलसंस्कृती मंडळ ,धुळे शाखा ह्या कामात काममग्न झाली. स्थापनेपासून फक्त सहा महिन्याच्या कालखंडात ह्या शाखेने एक यशस्वी उड्डाण करण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे आमच्या सल्लागार मंडळातील अनुभवी व्यक्तींची मोलाची साथ उपयोगात आली. यामधील श्री.मुकुंद धाराशिवकर, श्री.वसंतराव ठाकरे व डॉ.धनंजय नेवाडकर यांनी या संपूर्ण कार्यक्रमास आपल्या वयाकडे न बघता वरील संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोलाची साथ दिली. गावाची व ठिकाणाची निवड त्यांनीच करून ठेवली त्यामुळे काम करणे सोपे गेले व आमच्या शाखेतील तरूण, वयस्कर, स्त्रीया यांनी स्वत: पुढाकार घेवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाची साथ दिली त्याबद्दल त्यांचे ऋण मानणे मी माझे कर्तव्य समाजतो.

धुळे शाखेने 23 फेब्रुवारी 2013 रोजी एकाच दिवशी तीन कार्यक्रम घेण्याचे ठरविले. त्यातील पहिला म्हणजे धुळे शाखेचे उद्घाटन डॉ.दत्ता देशकर (अ.भा.जलसंस्कृती मंडळ, अध्यक्ष) यांच्यामार्फत करणे. दुसरे म्हणजे पर्यावरण संरक्षण या विषयावर कार्यशाळा आयोजित करणे व यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यात पर्यावरण संरक्षणाबद्दल जनजागृती घडवून आणण्याचे उद्दिष्ट वरील अतिथींच्या मदतीने घडून आले. तिसरे म्हणजे दिवाणमळा गावाजवळ लळींग पायथ्याजवळ दोन गॅबियन पध्दतीचे बंधारे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने बांधण्याचे उद्दिष्ट्ये सुध्दा पूर्ण करण्यात आली. वरील तिन्ही कार्यक्रमांच्या उद्दिष्टांचे फलीत खालील प्रमाणे -

1. भारतीय जलसंस्कृती मंडळ, धुळे शाखेच्या उद्घाटनाच्या माध्यमातून अशी शाखा धुळे जिल्ह्यात काम करते हा विश्वास लोकांपर्यंत पोहचविला.
2. पर्यावरण संरक्षण ही आज काळाची गरज आहे. हे विद्यार्थी व ग्रामस्थांपर्यंत कार्यशाळेच्या माध्यमातून पोहचविण्यात आले.
3. गॅबियन पध्दतीचा बंधाऱ्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांपर्यंत आपण हे काम एकत्र येवून करू शकतो ही सामाजिक भावना रूजविली गेली व हे काम अशक्य नाही ही भावना वाढीस लावण्यात आली.
4. गॅबियन पध्दतीचा बंधाऱ्यामुळे कमी खर्चात पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रकल्प हाती घेण्यात आला त्यामुळे भविष्यात निश्चित बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या विहिरींमध्ये पाणी पातळी वाढविण्यास नक्की मदत होईल. जेव्हा हा फायदा ग्रामस्थांना दिसून येईल तेव्हा तेच पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्पांसाठी स्वत:हून पुढाकार घेण्यास सक्षम ठरतील.

वरील प्रकारे भारतीय जलसंस्कृती मंडळ, धुळे जिल्हा शाखा अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत असे भरीव कार्य करण्यास तयार झाली आहे. एकूण 350 विद्यार्थी व विद्यार्थींनी व 100 ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून बंधारा बांधण्यात आला. या सर्व कार्यात ज्यांनी ज्यांनी मदत व सहकार्य केले या बद्दल मी भारतीय जलसंस्कृती मंडळ, धुळे जिल्हा शाखेच्या वतीने वरील सर्वांचे आभार मानतो. यापुढे हे कार्य अधिक जामाने व नेटाने पुढे नेण्याचे आमच्या शाखेचे उद्दिष्ट्य आहे.

जलक्षेत्रात आढळणाऱ्या यशोगाथा वाचकांसमोर अनुकरणार्थ सादर करण्यात येत आहे.
(सुधाकर स्मृती कोषातर्फे )

धुळे जिल्हा शाखेचा, जलसंवर्धनासंबंधीचा स्तुत्य उपक्रम - डॉ.संजय पाटील, धुळे

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading