पुणे पर्वती क्लबने दिला जलसाक्षरतेवर भर

Submitted by Hindi on Sun, 04/16/2017 - 11:27
Source
जलसंवाद, मार्च 2017

पाणी विषयक पुणे व दूरपर्यंत काम करणारे रोटरीचे डिस्ट्रीक्ट डायरेक्टर सतीश खाडे यांनीही या विषयात आर्किटेक्ट व्यावसायीकांसाठी जुन्या नवीन संकल्पनांचा उहापोह केला... त्यांनी मांडलेले मुद्दे...

पृथ्वीवरील सर्वात मुलभूत आणि सर्वोच्च जीवनमूल्य असलेले पाणी... दुर्मिळतेकडे वेगाने वाटचाल करते आहे.... त्यातून जंगले, प्राणी यांचे अस्तीत्व संपत चाललेले आहे. आता लवकरच माणसाची पाळी आली आहे.... पण माणूस मात्र आपल्याच धुंदीत जगत आहे…

पाणी विषयक जागृती सर्वांना आवश्यक आहे. यंदा रोटरी 3131 ने जलसाक्षरता मोहीमीचा सुरूवात जोरदार केली आहे. आणि पुढील काही वर्षात ती अधिकाधीक तीव्र करणे ही काळाची गरज आहे.

पाण्याचे नियोजन अनेक नव्हे सर्वच क्षेत्रात व्हायला हवे आहे. प्रत्येक व्यवसायिक, संस्था, कुटुंब, गाव न् वैयक्तिक पातळीवर आपण काय करू शकतो यावर मंथन करीत कृती कार्यक्रम तयार केला पाहिजे. एकमेकांना बरोबर घेत, एकमेकांना दिक्षा दिली पाहिजे. म्हणजेच आर्किटेक्ट्स, हॉटेल्स, हॉस्पीटल्स, आय.टी कंपन्या, इतर कंपन्या, मंगल कार्यालये, कार वॉशिंग सेंटर्स, प्लंबर्स, बिल्डर्स या आणि अशा सर्वांना जलसाक्षरेतची गरज आहे.

हा विचार घेवूनच एका चर्चासत्राची आखणी रोटरी क्लब पुणे पर्वती यांनी केली. ती केली आर्किटेक्टस्साठी. हा विचार Wide Angle Forum या आर्किटेक्ट चा एक फोरम यांच्याबरोबर चर्चा करून खूप पुढे नेला.

Wide Angle Forum आणि रोटरीला एकत्र आणण्याचे काम आर्कि. वैशाली चौधरींना केले. सौ. वैशाली या फोरमसाठी आणि रोटरी साठी खूप उत्तमोत्तम सामाजिक उपक्रम राबवितात. रोटरीत चर्चा झाल्याने, त्यांनी हा विषय एकदम मनावर घेतला आणि Wide Angle Forum आणि रोटरी क्लब, पर्वती यांच्या संयुक्त विद्यमाने Thirsty City हा चर्चासत्राचा कार्यक्रम आखला गेला... 2 डिसेंबर 2016 रोजी.

Wide Angle Forum च्या प्रिया गोखले ह्या उत्साही आर्किटेक्ट आणि फोरम च्या फाऊंडर हेड... त्यांनी यासाठी सर्व प्रकारचे नियोजन केले. हॉल पासून निमंत्रणापर्यंत... नामवंत आर्किटेक्ट पासून कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी माहिती पोहचवून, त्यांना चर्चासत्र ऐकण्यास उद्युक्त केले.

चर्चासत्रात भाग घेतलेले चार जण आर्किटेक्ट तर तीन जण पाणी विषयात तंत्रज्ञानाच्या आणि समाजिक उपक्रमांच्या अंगानी काम करणारे होते.

ज्योती पानसे यांनी विविध इमारती मध्ये रावविलेले जलसंधारणाबद्दल माहिती दिली. श्री. दांडेकर हे पाषाण टेकडी व पाषाण लेक परिसारात अनेक कार्यकर्त्यांना बरोबर घेत जलपुनर्भरणावर काम करत आहेत. त्यांनी त्यांचे अनुभव मांडले.

प्लंबर्स असोसिएशन चे श्री. देशपांडे यांनीही त्यांच्या संस्थेमार्फत प्लंबर्स व इतर समान घटकांना बरोबर घेत करत असलेल्या जलसंवर्धनाच्या कामातून प्लंबिंग माध्यमातून पाणी साठवणे, वाचवणे या विषयावर चांगले सादरीकरण केले.

पाणी विषयक पुणे व दूरपर्यंत काम करणारे रोटरीचे डिस्ट्रीक्ट डायरेक्टर सतीश खाडे यांनीही या विषयात आर्किटेक्ट व्यावसायीकांसाठी जुन्या नवीन संकल्पनांचा उहापोह केला... त्यांनी मांडलेले मुद्दे....

1. प्रत्येक इमारतीत बोअरवेल रिचार्ज किंवा पिट रिचार्ज च्या माध्यमातून पाणी साठवण करायचे.

2. पब्लिक असो वा वैयक्तिक वापराचा नळ असू दे, त्यातील डिस्चार्ज 6 लिटर / मिनीट इतकाच असला पाहिजे यावर कटाक्ष ठेवा.

3. पब्लिक युरीनल्स ह्या सक्तीने वॉटरलेस करा, त्यासाठी खूप, स्वस्तातले उपाय उपलब्ध आहेत.

4. फार्म हाऊस... आणि टाऊनशिप येथे सी.सी.टी - ट्रेन्चेस आणि इतर सर्व माध्यमातून पावसाचे तसेच सांडपाणी हे जिरवण्यासाठीची उपाय योजना करा.

5. स्विमिंग टँकचे पाणी बदलतांना आधिचे पाणी सांडपाण्यात न सोडता, जमिनीत जिरवण्याची व्यवस्था करा.

6. सेप्टीक टँक पध्दतीचा जास्तीत जास्त वापर करा.

7. सांडपाणी प्रक्रियेसाठी आधुनिक आणि स्वस्तातले पर्याय घ्या.

एकूण काय तर जलसंवर्धनात आर्किटेक्ट्स हे खूप मोलाचा घटक ठरू शकतात. हे आर्किटेक्टस् नाही उमगले आहे.

रोटरी क्लबच्या वतीने प्रेसिडेंट चंद्रकांत जगताप व त्यांच्या टीमने नियोजनात आणि आर्थिक बाबतीत मोलाचा वाटा उचलला…

व्होकेशन आणि वॉटर लिटरसी या विषयात पहिला प्रकल्प करण्याचा मान रोटरी क्लब पर्वतीला मिळाला, याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो.

रो. रश्मी कुलकर्णी, मा. अध्यक्ष रोटरी क्लब - पुणे पर्वती

Disqus Comment