वॉटर फेस्टिव्हल - महिला अध्यक्षांनी उचलली जबाबदारी

16 Apr 2017
0 mins read

2016-2017 या वर्षात रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 यांनी अनेक प्रकल्पापैकी पाणी या विषयावर प्रकल्प करायचे ठरवले. वेगवेगळ्या स्तरावर असणारे पाण्याचे प्रश्‍न वेगवेगळे आहेत. पाणी’ हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा व गहन आहे.

पाणी’ प्रकल्प मधलाच एक भाग Water Festival. या उपक्रमासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील महिला प्रेसिडेंट असणारे क्लब पुढे सरसावले. या महिला प्रेसिडेंट एकत्र येऊन काम करु लागल्या.

तसेच इतर उपक्रमांसाठी अनेक क्लबने पुढाकार घेतला. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन केले गेले. निबंध, वक्तृत्व, नाट्य, स्लोगन, पोस्टर, फिल्म या स्पर्धा आयोजित केल्या. विषय एकच पाणी .

फिल्म बनवणे या मधे आमच्या क्लब मधील Annet यांनी सहभाग घेतला. फिल्म बनवणे ही संकल्पना कळल्यावर त्या मुलांनी उत्साहाने तयारी दर्शवली. त्यानंतर मुले धावपळ करताना दिसत होती.

शेवटची तारीख उलटून गेली तरी,हातात फिल्म आलेली नव्हतीच. अजून काही दिवस गेले. मुले मेहनत करताना दिसत होती,पण फिल्म हातात पडत नव्हती,कोठे पाणी मुरत होते हे कळत नव्हते.

अखेर फिल्म तयार झाली. फिल्म पहाताना त्यांचे अनुभव विचारले.

अनुमित - फिल्म तयार करायची असे ठरल्यावर इतका वेळ लागेल असे वाटले नाही. खूप सोपे आहे असे वाटले. पण फिल्म तयार करताना अनेक लहान - सहान गोष्टी विचारात घेण्यास लागतात.

सोहा - नुसते शुट केल्यावर फिल्म तयार होइल असे वाटले. Edit करायला वेळ लागेल हे माहित होते, पण ऐवढा वेळ ??? गोष्ट तयार करण्यासाठी खूप चित्रे काढावी लगणार होती, खूप जणाचे interview घ्यायचे होते, हे करताना मजा आली. खूप काही नविन गोष्टी शिकायला मिळाल्या.

तिथी - Animation फिल्म साठी,चित्रे काढून शूट करणे,यालाच फक्त वेळ लागेल असे वाटले होते.

सोहा - सर्वां मते (interview) विचारात घेऊन ती कशी मांडणे हे महत्वाचे होते.

फिल्म Edit करणे हा सर्वात महत्वाचा विषय असतो व त्यालाच सर्वात जास्त वेळ लागला हे या तिघांनी मान्य केले.

तसेच पाणी हा विषय असल्याने, इतरांची मते ऐकल्यावर, पाणी या विषयावर हे तिघे अधिकच भावनिक झाल्याचे आढळले.

अनुमित - आता घरी सुद्धा, शॉवर न घेता बादलीत पाणी घेउन आंघोळ करतो. नळ सुरु असेल तर बंद करतो. हवे तेव्हढेच पाणी पिण्यासाठी घेतो. निमित्त होते स्पर्धेचे, पण या स्पर्धामुळे नविन पिढी किंवा युवा पिढी यांच्या मनात पाणी वाचवा या अभियानात सकारात्मक बदल होत आहे हे खरे.

ज्याप्रमाणे रोटरीने पोलीओचा समुळ नाश केला त्याच प्रमाणे एक काळ असा असेल पाणी टंचाई ह्या शब्दाचा नाश झाला असेल .

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading