याला काय नाव द्याल कृषी पंढरी तीर्थ की समांतर कृषी विद्यापीठ


ठिंबक हे प्रभावी साधन-यंत्र आहे. पीक-पाणी जमीन व्यवस्थापनाचे! अधिक उत्पादनाचे ! कृषीक्षेत्रात व शेतकरी जीवनात सुख-समृद्धी फुलविण्याचे! शेतकर्‍यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास घडविण्याचे ‘शेतकरी सुखी, तर जग सुखी!’

या लेखाचा मथळा वाचल्याबरोबर क्षणात आपल्या मनात विचार चमकून जाईल, हे ठिकाण आहे तरी कुठे? पुरातन वस्तू, पुरातन किल्ले, दुर्गम घाट, बर्फाळ डोंगर, शांत सागरी किनारा, उंच डोंगरावरील धबधबा, उत्तुंग इमारती, घनदाट वनराईचे जंगल या बाबी जशा मनाला आकर्षित करतात, ओढ लावतात, आतुरता वाढवितात त्याचा तोलामोलाचे हे पण स्थळ आहे बर का! ते पण जळगावी !

जळगावसारख्या छोट्याशा जिल्हा असलेल्या गावालगत हे अनोखे, प्रेक्षणीय, धडे देण्यासारखे कृषी संस्कृती जपलेले ठिकाण आहे. ते म्हणजे जैन हिल्स! जैन इरिगेशन! कंपनीमार्फत कृषी क्षेत्राला वाहून घेतलेले हे रम्य ठिकाण! ७५० हे. क्षेत्रावर विखुरलेले घनदाट वनराईंनी वेढलेले, छोट्या छोट्या टेकड्यांमध्ये दडलेले हे एक विलोभनीय प्रशंसनीय स्थळ! मनाला ओढ लावणार आहे.

भगीरथाने पृथ्वीवर गंगा आणली महान तप करून, अथक प्रयत्नातून ज्या गंगेमुळे या भारत देशाची मान उंचावली त्यापेक्षा अवघड असे काम केले आहे, शक्य करून दाखविले आहे. एका महान तपस्वी व्यक्‍तिमत्त्वाने. केवळ प्रयत्न नव्हेत, यासाठी तन-मन-धन हे सर्व पणाला लावले आणि त्या मंथनातून निर्माण झाले ते एक कृषी क्षेत्र आणि ते घडविले आमच्या भाऊंनी ! त्यांनी एक स्वप्न पाहिले आणि ते खरे ठरविले. त्यासाठी स्वत:ला वेड लावून घेतलं कामाचं ! अहोरात्रा मेहनतीच! भाऊ! म्हणजेच आमचे आदरणीय श्रद्धास्थान श्री. भवरलाल भाऊ जैन. आम्ही सर्व जण त्यांना मोठे भाऊ म्हणून संबोधित असतो. जिथे आम्ही म्हणतो ‘तेथे कर माझे जुळती !’

एक अफाट कार्यक्षमता, दृढनिश्‍चय, सूर्याला गवसणी घालण्याचे प्रयत्न, एक नवीन ब्रह्मांड निर्माण करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न, स्वत: ऊन, वार्‍यात उभे राहून पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारले. धन्य ते भाऊचे मन ! सामान्य माणसासाठी पुढे सरसावले हेच ते एक असामान्य व्यक्‍तिमत्त्व! स्वामी विवेकानंद म्हणतात - ‘दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा अधिक उपयुक्‍त आहे.’ हे खरे ठरले पण यासाठी आपण प्रत्यक्ष भेट द्यायला पाहिजे जैन हिल्स, जळगाव या प्रक्षेत्राला! तेव्हाच कळेल त्याची महती आणि थेंब थेंब पाण्याची किमया. जादू बघणयासाठी आपण जरूर भेट द्यावी असे हे एकमेव ठिकाण. ज्या इस्राईल देशाचा ओढा म्हणून आमचे असंख्य शेतकरी, कृषीतज्ज्ञ, प्रचारक तिथे लांबवर जाऊन पाहत होते तेच इस्राईली लोक भारतात निर्माण झालेले हे मिनी इस्राईल बघण्यास येत आहेत. ठिबक सिंचनाची मक्‍तेदारी सांगणर्‍या इस्राईल देशाला आम्ही नमविले.

एका भारतीय कंपनीने केलेली ही वाटचाल याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे. भारतात हे घडले म्हणण्यापेक्षा घडविले याला महत्त्व आहे आणि ते पण शासकीय मदतीशिवाय स्वत:च्या घामाचे दाम. ठिबक सिंचनाचा केवळ तत्त्वज्ञानच सांगितले नाही, त्यासाठी कष्ट उपसलेत, करोडो रुपये खर्ची टाकलेत. आयुष्याचे एक तप घालविले, त्यातून नवचैतन्य निर्माण झाले जे आज ‘जैन हिल्स, जैन इरिगेशन’ म्हणून उभे आहे. ‘आधी केले आणि मगच सांगितले.’ पाणी हा विषय घेऊन सर्व प्रयोग यशस्वी केलेत. पावसाचे पाणी अडविले, जिरविले. एवढ्यावरच न थांबता त्या पाण्याला योग्य वळण देऊन पाईपात बंदिस्त केले. डोक्यावर घेतले. (टेकडीवर नेले) आणि ते तहानलेल्या वनश्रीला पाजले थेंबाथेंबाने म्हणजेच ठिबक सिंचन प्रणालीने. पडीक डोंगरमाथ्यावर, वळणावर, उतरणीवर, दगड धोंडे साफ करून फळझाडांची, पिकांची वनश्री फुलविली ती बाग आधुनिक पद्धतीने.

जैन हिल्स जैन इरिगेशन या प्रक्षेत्रावर आंबा, पेरू, सीताफळ, डाळिंब, चिकू ही फळझाडे तर बहरलीच आहेत. त्यांच्यासोबतीला आहे केळी, कांदा, कापूस, डाळिंब, आवळा ही नगदी पिके आणि भाजीपाला.

निरनिराळ्या पिकांवर कार्यक्षम सिंचन पद्धतीने यशस्वी प्रयोग


आंब्यावरील प्रयोग, केळीची उतीसंवर्धनापासून अधिक घड देणारी गाथा, कांद्यातून पैशांची हमी, फळांवर प्रक्रिया परंतु सर्व घटकांचा मूळ गाभा ठिबक सिंचन. जोड आहे आधुनिक उती संवर्धन प्रयोगशाळेची, केळी मातृवृक्ष बागेची. सुसज्ज शंभरावर शेडहाऊसेसची.

ठिबकच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा दस्तुरखुद्द दाखला इथेच अनुभवायला मिळतो. पिकाला पाण किती द्यावे, कुठे द्यावे, किती अंतराने द्यावे या सर्व अवघड प्रश्‍नांची उत्तरे सेप्या भाषेत दिलीत आमच्या प्रयोगांनी. ठिबकावरील पिकावर संशोधनाने केळीसाठी मशागती पद्धतीने.

उद्योग समूह थाटून केवळ संपत्ती मिळविणे हा हेतू कधीच ठेवला नाही. आजही ठेवीत नाही. जनसामान्यांच्या मूळ गंभीर समस्येला हात घालून पुढाकार घेतला. जैन उद्योग समुहाने. ठिबक सिंचनप्रणाली खर्‍या अर्थाने विकसित केली, प्रसारित केली आणि आज त्याचा लाभ लाखो शेतकर्‍यांना होत आहे. ठिबकामुळे देशाचे पाणी तर वाचविलेच पण कृषी उत्पादन, पीक उत्पादन वाढविली दुपटीने. शेती उत्पादित मालाचा दर्जा सुधारला, वीज (ऊर्जा) वाचली, मनुष्यबळ वाचले, पाणथळ जमिनी पिकांनी बहरू लागल्या किती तरी फायदे. खतांची बचत, वेळेची बचत, मशागत कमी या तर आमच्या जमेच्याच बाजू आहेत. ठिबकनंतर प्रयोग आखले सिंचनातून खत देणे, उती संवर्धित दर्जेदार रोपे बनविणे, करार शेती, आधुनिक रोपवाटिका, हरितगृहातील शेती, पॉलीहाऊसमधील शेती, केवळ अधिक उत्पादनांवर समाधान न मानता शेतीमालाची साठवणूक, प्रतवारी, फळे पिकविणे, त्यावर प्रक्रिया करणे यात आशिया खांडात आघाडी घेतली जैन इरिगेशन उद्योग समुहाने. शिस्त, स्वच्छता, निर्व्यसनी सहकारी वर्ग, संस्कृतीची जपणूक याला आमच्या जैन उद्योग समुहाला तोड नाही. हजारो टन फळे प्रक्रिया करून पाठविली साता समुद्रापार जैन फूड विभागाने.

भाऊंनी गुणी, तज्ज्ञ माणसे, कुशल कारागीर, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ एकत्रित गुंफले आणि त्यांच्या हातून हा कार्यभाग घडवून आणला.संप, मोर्चे हे शब्द आमच्या शब्दकोशातच नाहीत. ही आमची संस्कृती नाही, हा उद्योग समुहांतील अभिनव चमत्कार आहे. मानवी जीवनातील कठीण प्रसंग, अडचणी, गरजा यांच्या मानसशास्त्र दृष्टीने अभ्यास करून आजही मायेचा हात देऊन प्रश्‍न सोडविले आमच्या जैन उद्योग समुहाने. जगात याला तोड नाही! झाले बहु, होतील बहु परी या सम हाच! जैन इरिगेशन. ज्रुसता महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारत देशच काय पण जग आमच्याकडे टक लावून बघत आहे. कशासाठी ? पाणी प्रश्‍नाला उत्तर मिळविण्यासाठी ! पाण्याच्या कार्यक्षम उपयुक्‍ततेसाठी ठिबक सिंचनासाठी! आम्ही जगातील सिंचनाचे प्रश्‍न सोपे करू शकू, आमच्या दर्जेदार ठिबक सिंचन प्रणालीने, हा आमचा विश्‍वास आहे. हवामान काही पण असो, जमिनी कशापण असोत, पाण्याची प्रत काही पण असो, पीक कोणतेपण असो आमच्याजवळ उत्तरे आहेत, आमच्या ठिबक सिंचनातून. ते आमचे प्रभावी हत्यार आहे. मानवी जीवनाच्या उद्धारासाठी आम्ही हे हत्यार उपसले आहे. ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!’ मानवी जीवनात सामाजिक- आर्थिक परिवर्तन घडत आहे.

ठिंबक हे प्रभावी साधन-यंत्र आहे. पीक-पाणी जमीन व्यवस्थापनाचे! अधिक उत्पादनाचे ! कृषीक्षेत्रात व शेतकरी जीवनात सुख-समृद्धी फुलविण्याचे! शेतकर्‍यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास घडविण्याचे ‘शेतकरी सुखी, तर जग सुखी!’

या सर्व कामकाजावर कळस चढविला तो आमच्या जैन आधुनिक शेतकरी प्रशिक्षण केंद्राने. दरवर्षी भारतातील सर्व प्रांतातून हजारो शेतकरी नवीन तंत्रज्ञान, आधुनिक ज्ञान घेण्यासाठी आवर्जून येत आहेत. आठ दिवस- पंधरा दिवस प्रशिक्षण घेऊन ज्ञानाची शिदोरी घेऊन आपल्या शेतीवर हे राबविण्यास सिद्ध होत आहेत. भारतच नव्हे तर सिलोन (श्रीलंका) किर्गीस्तान, अरबराष्ट्रे, पाकिस्तान, अफगाणिस्थान, ओमान, सुदान येथूनसुद्धा शेतकरी प्रशिक्षणासाठी येत आहेत. केवळ शेतकरीच नाहीत तर असंख्य कृषीतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, विद्यार्थी, बॅक अधिकारी, कृषी कर्मचारी हे पण आमच्या जैन हिल्सवरील प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित होत आहेत. कृषी मेळावे, चर्चासत्रे, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके हे पण आम्ही साध्य केले आहे. सुसज्ज प्रशिक्षणवर्ग, प्रात्यक्षिकांसाठी शेती-पीक, साधने सादर आहेत. अतिउत्तम सर्व साधनांसह सुसज्ज प्रयोगशाळा! प्रशिक्षणासाठी सुसज्ज असे आधुनिक अतिथीगृह आणि सुस्वाद शाकाहारी कक्ष! हे सर्व एकाच प्रक्षेत्रावर बघायला मिळाले, अनुभवायला मिळतात, जैन हिल्स, जैन इरिगेशन जळगाव प्रक्षेत्रावर. ‘कामाची मालकी’ हा मूलमंत्र मनी घेऊन काम हेच कर्तव्य ! काम (कार्य) हीच उपासना ! ‘कामाविना वेळ घालवू नको रे !’ या काव्यपंक्‍ती इथेच अनुभवता येतील. ते तीर्थक्षेत्र- कृषीक्षेत्र- जैन हिल्स, जैन इरिगेशन जळगावी- खानदेशच्या मातीत रुजलेले! फुललेले! प्रत्यक्ष भेट द्या.

भाऊंच्या पिढीने ज्या खस्ता खाल्ल्या त्यांचेच अनुकरण पुढील पिढीपण जोमाने, निर्धाराने करीत आहेत. भाऊंच्या अंगी असलेले सद्‍गुण कुटुंबातील प्रत्येक व्यक्‍तींमध्ये सामावले आहे. तीच शिस्त तीच कामाप्रती निष्ठा, भाऊ! नातवंडापर्यंत एका उच्च संस्कृतीचे गुण एकत्रित करीत आहेत. पुढील पिढ्यांतसुद्धा संस्कृती टिकून राहावी त्यांना बालवयातच निसर्ग, मानवता, कौटुंबिक प्रेम, आदर हे संस्कार दररोजच्या प्रभातफेरीत घडवीत आहेत.

आमचे श्री. अशोकभाऊ, श्री. अनिलभाऊ, श्री. अजितभाऊ आणि श्री अतुलभाऊ यांनी या कंपनीचा कठीण असा मेरू पर्वत आपल्या शिरावर अचलून धरला आहे. फार मोठ्या जबाबदार्‍या स्वीकारल्या आहेत. सातत्याने प्रगती पथावर उद्योग सुमहाची वाटचाल आहे. चांगला वारसा असलेली दिंडी अहोरात्र पुढेच जात आहे. याकामी या नवीन पिढीचे मोठे योगदान आहे. जगात अव्वल स्थान मिळविण्यासाठी आम्ही धडपडत आहोत. या कृषी दिंडीच्या पताका सर्वत्र फडकत आहेत. जगात अव्वल येण्यासाठी ‘सतत सैनिका पुढेच जायचे’ असा आमचा मंत्र आहे. भारतात सर्व विभागात विक्रेते आणि वितरक यांचे भक्कम जाळे पसरविले आहे. जगातील इतर देशातसुद्धा जैन इरिगेशनची कार्यालये आणि कारखाने कार्यरत आहेत. मग ते इस्राईल असेल वा अमेरिका तिथे आमची हजेरी आहेच. जगाला आधुनिक शाश्‍वत कृषी शिकविण्याचा आम्ही वसा घेतला आहे. दर्जेदार उत्पादने, रास्त किंमती, योग्य पुरवठा, विक्री उपरांत सेवा यामध्ये आम्ही इतरांच्या तुलनेत अग्रेसर आहोतच. कारखाना जळगावी असो की अमेरिकेत, की उदमलपेठ किवा चित्तुर- बडोदा येथे शिस्तबद्ध इमारती, उच्च उत्पादन क्षमता, स्वच्छता आणि शिस्त हे मनाला मोहून टाकतात. हे वाखाण्यासारखे आहे.

उद्योग समुहाने सांस्कृतिक चळवळीलासुद्धा हातभार लावलेलाच आहे. मग ते नाट्यसंगीत असेल, मैदानी खेळ असतील, साहित्य संमेलन असतील किंवा कवी संमेलने, राष्ट्रीय कार्यक्रम, राष्ट्रपिता महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यता पावलेले विद्यार्थी यांचे कौतुक सोहळे असतील किंवा देशोपयोगी, राष्ट्रोपयोगी कार्यक्रम असतील यामध्ये अग्रभागी राहून सर्वतोपरी साहाय्य केले जात आहे. जळगाव नगरीचे सुशोभीकरण असेल, वाकोदसारख्या दुर्गम छोट्याशा खेड्याचा उद्धार असेल किती तरी उपक्रम जैन उद्योग समुहाने हाती घेतले आहेत.

ही सामाजिक सेवा नि:स्वार्थपणे केली जात आहे. मानव समाजातील तळागाळातील माणसांसाठी आमचा उद्योग समुह कार्यरत आहे. मग कधी कधी नैसर्गिक संकटासाठी सामना करण्यासाठी आर्थिक मदत, रक्‍तदान किती तरी उपक्रम, नोंदी घ्यायच्या ठरल्यास इतिहास गाथा लिहिता येईल. अशा या उद्योग समुहात आम्ही खारीचा वाटा उचलून काम करीत आहोत यायाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

‘'Seeing is a believing; Learning by doing ''!
''Learning is direct earning ''!
''A Country which saves water will save this world ''!
''Water if life ''!
''Without water world will be desert''!
'' No life on earth can survive without water''!


Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading