वरील सर्व नियोजन निश्चित झाल्यावर गावात आणखी सिंचन विहीरी शक्य व आवश्यक आहेत काय व त्यांना परवानगी द्यावयाची काय याबाबत तांत्रिक समितीने निर्णय घेवून ग्रामसभेत चर्चा करावयाची आहे. चर्चेत झालेला निर्णय ग्रामसभेने अंमलबजावणीत आणावयाचा आहे.
महाराष्ट्रातील भूजल समजून घेताना त्याचे तांत्रिक, आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय पैलू जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या लेखमालेच्या माध्यमातून हे सर्व पैलू विस्ताराने सोदाहरण मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यात महाराष्ट्रातील भूजलाची निर्मिती, प्रवास, वारसा, उपलब्धी, वापर, गुणवत्ता, व्यवस्थापन, संहिता, धोरण अशा क्रमाने या सर्व पैलूंची उकल करण्यात येणार आहे).
GP – 20 | जिल्हा जालना |
सरासरीच्या तुलनेत | उपलब्ध होणार्या भूजल |
पर्जन्यमानातील घट | संपत्तीतील घट |
० ते २० टक्के | ३५ टक्के पर्यंत |
२१ ते ५० टक्के | ३६ ते ५० टक्के पर्यंत |
GP – 20 | जिल्हा जालना |
सरासरीच्या तुलनेत | उपलब्ध होणार्या |
पर्जन्यमानातील घट | भूजल सपंत्तीतील घट |
० ते २० टक्के | ३५ टक्के पर्यंत |
ते ५० टक्के | ३६ ते ५० टक्के |
>५० टक्के | ६० ते ८० टक्के पर्यंत |
WR - 2 | सरासरीच्या जिल्हा अमरावतील उपलब्ध |
तुलनेत पर्जन्यमानातील घट | होणार्या भूजल संपत्तीतील घट |
० ते २० टक्के | २५ टक्के पर्यंत |
२१ ते ५० टक्के | ५० ते ६० टक्के पर्यंत |
>५० टक्के | डेटा नाही |
शाश्वत पर्जन्यमान असल्याकारणाने बेसाल्ट खडक असूनही नैसर्गिक पुनर्भरण होण्यास चांगला वाव असल्याने आकडेवारीमध्ये वेगळेपणा असावा असा अंदाज आहे. या भागातील विहीरींची खोली म्हणजेच जलधराची खोली अधिक असल्याने त्याचाही परिणाम भूजल उपलब्धतेवर होतो.
४. पुणे जिल्ह्यात भीमा उपखोर्यातील BM – 60 या पाणलोट क्षेत्रातील पाऊस व भूजल उपलब्धेतेचा अंदाज केला असता, खालील प्रमाणे निष्कर्ष काढता येईल -
BM – 60 | जिल्हा पुणे |
सरासरीच्या तुलनेत | उपलब्ध होणार्या |
पर्जन्यमानातील घट | भूजल संपत्तीतील घट |
० ते २० टक्के | २५ टक्के पर्यंत |
२१ ते ५० टक्के | २५ ते ४० टक्के |
५० ते ६५ टक्के | ७५ टक्के पर्यंत |
५. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा उपखोर्यातील WGK – 6 या पाणलोट क्षेत्रातील पाऊस व भूजल उपलब्धतेचा अंदाज यांचा अंदाज केला असता, खालील प्रमाणे निष्कर्ष काढता येईल. यात प्रामुख्याने रूपांतरीत खडकाचे प्राबल्य आहे.
WGK – 6 | जिल्हा भंडारा |
सरासरीच्या तुलनेत | उपलब्ध होणार्या |
पर्जन्यमानातील घट | भूजल संपत्तीतील घट |
० ते २० टक्के | ४० टक्के पर्यंत |
२१ ते ४० टक्के | ४१ ते ६० टक्के |
>४० टक्के | डेटा नाही |
६. जळगाव जिल्ह्यात तापीच्या उपखोर्यात या रावेर तालुक्यातील पाणलोट क्षेत्रातील पाऊस व भूजल उपलब्धतेचा अंदाज यांचा अंदाज केला असता, खालील प्रमाणे निष्कर्ष काढता येईल. यात प्रामुख्याने गाळाच्या खडकाचे प्राबल्य आहे. मुळात गाळाच्या प्रदेशात भूजलाची साठवण क्षमता जास्त असते व जलधरांची संख्या देखील एकापेक्षा अधिक असते. सिंचन विहीरींची सरासरी खोली ६० मीटर असल्याने पावसाचा थेट परिणाम भूजल उपलब्धतेवर लवकर दिसत नाही.
TE - 2 | जिल्हा जळगाव |
सरासरीच्या तुलनेत | उपलब्ध होणार्या |
पर्जन्यमानातील घट | भूजल संपत्तीतील घट |
० ते २० टक्के | २० टक्के पर्यंत |
२१ ते ५० टक्के | ४० टक्क्यांपर्यंत |
>५० टक्के | डेटा नाही |
श्री. शशांक देशपांडे, पुणे - मो : ०९४२२२९४४३३