ब्लु प्लॅनेट या संस्थेची स्थापना सन २००२ साली झाली आणि तेंव्हा पासून त्यांचे महत्वाकांक्षी ध्येय हेच होते की जे २०० मिलियन लोकं पाण्याच्या प्रतीक्षेत आहे त्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे. सन २००६ पासुन , ब्लु प्लॅनेट नेटवर्कने जगभरातील पाणी आणि स्वच्छता प्रकल्पांचे परिणाम वाढविण्यासाठी , डिझाईन केलेले कार्यक्रम आणि सेवांचे एक शक्तिशाली संच,( किंवा त्याला समूह म्हणता येईल), तयार केले आहे. हे सगळे ब्लु प्लॅनेटने डिझाईन केलेले प्रोग्राम अंमलबजावणी साठी त्यांच्याशी संबंधित सगळ्या जागतिक समुदाय , फंडर्स (आर्थिक मदत करणारे ), संशोधक , सरकार , सार्वजनिक संस्थाने यांना सुरक्षित पिण्याचे पाणी किंवा स्वच्छता बद्दल चे प्रोग्राम ऑनलाईन उपलब्ध करतात.
आज २७ देशांत १०० पेक्षा जास्त अग्रगण्य संस्था आणि हजारो जागतिक समुदाय , शाश्वत पाणी आणि स्वच्छता कार्यक्रम तयार करण्यासाठी , स्मार्ट मार्गाचा कसा अवलंब करायचा यासाठी ब्लु प्लॅनेटला प्रोत्साहन देतात व तंत्रज्ञान बळकट करतात.
ब्लू प्लॅनेट नेटवर्क सदस्यांची कोर टिम US आणि ऑस्ट्रेलियाला असून जगभरातील त्यांचे अनेक सहयोगी व १०० च्या वर नेटवर्क क्षेत्रात अनुभवी लोक त्यांच्या पाठिशी आहे जे त्यांना शुद्ध पाणी आणि सॅनिटेशनच्या क्षेत्रात अधिकार प्राप्त करण्यात मदत करतात.
ब्लू प्लॅनेट नेटवर्क चे नेटवर्क अरेंजमेंट
ब्लू प्लॅनेट नेटवर्क सदस्यांना ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था , टॉयलेट आणि स्वच्छतेसाठी सहाय्य वितरणासाठी मदत देण्याचे आणि पुनर्वसन करण्याचे काम पण करते..
हे काम सोपे नव्हे पण संस्था लोकांना मदत करते. स्वतः चे जिवन बदलण्यासाठी ह्या संस्थे चे एक भाग व्हा, असे आव्हान पण ब्लू प्लॅनेट करते. ब्लू प्लॅनेट नेटवर्क ने २७ देशातील २ मिलियन लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचे अधिकार प्राप्त करून दिले आहे.
संस्था म्हणते पाणी कां ? म्हणजे , शुद्ध पाण्याला इतके महत्व कां ? कारण या जगाला जर प्रभावशाली व शक्तिशाली बनवायचे असेल तर लोकांपर्यंत शुद्ध पाणी पोहचविणे जरुरी आहे. या करिता ब्लू प्लॅनेट नेटवर्क ने खालील गोष्टी नमुद केल्या आहे.
अशुद्ध पाण्या मुळे आजारपण येतात आणि मृत्यू पण होतो. अशुद्ध पाण्या मुळे जगात दर तासाला २०० मुले मरण पावतात व जगातील दवाखान्याच्या अर्ध्या खाटा अशुद्ध पाण्याच्या आजारा मुळेच भरलेल्या असतात.
जगात दर वर्षी , ३.४१ मिलियन लोकांचा पाणी , सॅनिटेशन व हायजीन या मुळे मृत्यू होतो.
जर पाणी, सॅनिटेशन व हायजीन याचा दर्जा वाढविला तर जगातील १० टक्के आजारांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल असे संस्थे चे मत आहे.
शुद्ध पाणी मिळत असेल तर मुलांचे आजाराचे प्रमाण कमी होते व शाळेत मुलांची उपस्थिती वाढते, स्त्रियांचे अधिकार वाढतात आणि मुख्य म्हणजे एक स्थिर समाज पैदा होतो . तसे बघितले तर आज जगात १ बिलियन लोकांना शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे.
सगळ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हा काही तांत्रिकदृष्ट्या मोठा भाग नव्हे किंवा आपल्या कडे पैसे नाही असाही भाग नाही. तर याला कारणीभूत जर कोणी असेल तर तो मनुष्यच आहे. समाजाचा सहभाग कमी असल्या मुळे ५० टक्के पाण्याचे प्रकल्प फेल होतात असे ब्लू प्लॅनेट नेटवर्क चे मत आहे.
असेच एक पाण्या संदर्भातील प्रोजेक्ट ब्लू प्लॅनेट नेटवर्कने महाराष्ट्रात , अहमदनगर जिल्हयातील एक लहानसे गाव महानदुलवाडी येथे केले. महानदुलवाडी हे ६-७ लहान लहान गावांच्या समूहा पैकी एक गाव. हा दुष्काळी भाग असल्या कारणाने इथे नेहमी पिण्याच्या पाण्याची टंचाई. सन २०१२ मधे महाराष्ट्र राज्याच्या रिजिनल ड्रिंकिंग वॉटर स्कीम अंतर्गत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्या करिता प्रकल्प हाती घेण्यात आले पण उन्हाळ्यात ते पण आटायचे. महाराष्ट्र शासनाकडे या गावाच्या पाण्याच्या प्रश्ना कडे काही निदान नसल्या कारणाने गावकर्यांनी ब्लू प्लॅनेट नेटवर्क व वॉटरशेड ऑरगनायझेशन ट्रस्ट ची मदत घेतली.
संस्थे ने ११ जून २०१४ ला कामाला सुरवात केली आणि ३१ डिसेंबर २०१४ ला काम पूर्ण केले व ९०० गावकर्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले . या करिता ब्लू प्लॅनेट नेटवर्क ने पाणी कुठल्या जागेवर आहे याचा शोध लावला व जागा ताब्यात घेतली. इतकेच नव्हे तर लोकांमध्ये जनजागृती करून हे कसे सामाजिक कार्य आहे ते समजावण्याचा प्रयत्न केला व त्यांना दोन आठवड्याचे प्रशिक्षण पण दिले.
महानदुलवाडी येथे पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प
या कामा अंतर्गत संस्थेने विहीर खोदून ५ HP चा पंप लावला , १०२० फुट भूमिगत पाईप लाईन टाकली. गावात जी २५००० लिटर ची टाकी होती तिची पण दुरस्ती करून लोकांच्या घरा पर्यंत पाणी नेले .
या प्रकल्पा मुळे फायदा काय झाला म्हणावा तर, महानदुलवाडीतील विहीर दुष्काळात पण पाण्यानी भरली असायची . बायकांची पाण्या करिता करावी लागणारी पायपीट वाचली , त्यांचा वेळ वाचला . मुलांना खेळायला व अभ्यासाला वेळ मिळू लागला. वॉटरशेड ऑरगनायझेशन ट्रस्ट ने सेल्फ हेल्प ग्रुप तयार करून क्लोरीन ने पाणी कसे स्वच्छ ठेवायचे याचे ट्रेनिंग दिले.
ही संस्था PPP (Public - Private Partnerships) च्या माध्यमाने पण बरीच कामे करते. जसे ब्रिथ ऑफ लाईफ . विएतनाम मधली एका गावातील गोष्ट . एका मुलीने सुंदर बाळाला जन्म दिला . ती फर आनंदी होती . पण तिला कळले की बाळाला कावीळ झाला. ती निराश झाली . तिथल्या डॉक्टरांनी आपल्या परिने सगळे प्रयत्न केले पण बाळाला बरेच वाटेना म्हणून या संस्थेद्वारे बाळाला हनोई ला हलविण्यात आले व बाळ एकदम ठीक झाले.
कावीळ झालेल्या बाळा वर उपचार
सन २०१४ पर्यंत बे्रथ ऑफ लाईफ ने ४००००० नवजात शिशूंना जिवन दान दिले आहे. १.६ मिलियन लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचे अधिकार दिले . १,४०,००० सेप्टिक टँक वाले संडास बांधून दिले.
१.६ मिलियन स्त्रियांना आणि मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. अजून बरेच कार्य ही संस्था करते.
शैक्षणिक स्थर वाढविण्याचा कार्यक्रम
जिविके पासुन तर क्रियाशीलते कडे नेणारे हे एक नेटवर्क आहे. ब्लू प्लॅनेट नेटवर्क चे घोष वाक्य आहे - एक नेटवर्क , अनेक विचार , एक उद्देश.
ब्लू प्लॅनेट नेटवर्क यांचे सदस्य ऑनलाइन आणि एसएमएस टेक्स्ट मॉनिटरिंग सेवा देतात जेणेकरून त्यांना त्यांच्या जल व स्वच्छता प्रकल्पांचा मागोवा घेण्यास मदत होते. सदस्य पटकन व सहजपणे प्रकल्प माहिती ऑनलाइन प्राप्त करू शकतात. या कमी-खर्चाच्या साधनांमुळे प्रकल्पातील आव्हाने, टिकाऊ पद्धतींचा उपाय आणि समुदायाला, आपल्या स्वतःच्या पाणी आणि स्वच्छताविषयक सल्ल्याची जबाबदारी घेण्यास व सक्षम बनवण्यास मदत होते. संस्थे ने आता पर्यंत विकासाच्या कामा करिता आशिया खंडात १०६ मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे हे सगळे प्रोग्राम ते विएतमान , कंबोडिया, भारत, लाओस, आणि फिलिपिन्स येथून ऑपरेट करतात.
ब्लू प्लॅनेट नेटवर्कला त्यांच्या या कामा करिता सन २००९ ते २०१३ च्या कालावधीत खालील पारितोषिके मिळाली आहेत .
१. २००९ California Association of Non-Profits Innovation Award
२. २०१० Intel Environment Tech Award
३. २०११ World Bank Water Hackathon Prize
४. २०१२ World Summit Award
५. २०१३ Billionth Environment Award
ब्लू प्लॅनेट नेटवर्क चे मुख्यालय जगात तीन ठिकाणी आहे, अमेरिकेत ओकलॅड , आशियात विएतनाम आणी आफ्रिकेत युगांडा .
जागतिक स्थरावर कार्यालय १) आफ्रिकेत - बेनीन, आक्रा, घाना, किगाली, रवांडा ,कोतोनोऊ या ठिकाणी आहे तर ,
२) आशिया खंडात कंबोडिया , भारत ( न्यू दिल्ली ), लाओस, म्यानमार, फिलिपिन्स , व विएतनाम येथे आहे. इतकी मोठी संस्था चालवायला पैसा पण लागणार , तर निधी त्यांना खालील प्रमाणे उपलब्ध होतो,
स्रोत | टक्क्यात |
व्यापारी संगठना | १ % |
सामुदायिक संस्था | ४ % |
वैयक्तिक | १३ % |
सरकारी किंवा जागतिक संस्था | १३ % |
NGOs | ६९ % |
खंड | उत्पन्न टक्क्यात |
उत्तर अमेरिका | ६५% |
युरोप | ६% |
आशिया | १६% |
ऑस्ट्रेलिया | १३% |