लेख

संस्था परिचय : सर्कल ऑफ ब्लू (Circle of Blue)

Author : श्री. विनोद हांडे


सर्कल ऑफ ब्लू ही संस्था जागतिक स्थरावर होणार्‍या हवामान बदल किंवा परिवर्तना मुळे पाणी, अन्न आणि वीजेवर होणार्‍या परिणामाचे रिपोर्टिंग करते. सर्कल ऑफ ब्लू ही पत्रकार , जीवशास्त्रज्ञ आणि संवाद साधनां मधील तज्ञांचे एक आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे जे जागतिक स्तरावर स्वच्छ पेय जल समस्येवर उपाययोजना करण्या संबंधी आवश्यक माहिती देतात व विषय पण हाताळतात. सर्कल ऑफ ब्लू ही वॉटर पॅसिफिक इंस्टीट्युट द्वारा मान्यताप्राप्त नॉन-प्रॉफिट संस्था.

या संस्थेची स्थापना सन २००० साली वरिष्ठ दर्जाचे पत्रकार आणि वैज्ञानिकांनी केली ज्यांचा उद्देश नैसर्गिक स्त्रोतांच्या मुल-परिस्थिती तून मिळालेल्या माहितीचे सुसंगत, विश्वस्थ आणि अ‍ॅक्शनेबल रिपोर्टिंग तयार करते , आणि , पाणी हे केंद्र बिंदू ठेऊन त्याचे अन्न , उर्जा आणि स्वास्थ्य यांच्या वर होणारे परिणाम लोकांपुढे मांडते .

संस्थेच्या मते, जे जगाला भेडसवणार्‍या किंवा जे आव्हानात्मक गोष्टी आहे त्या म्हणजे पाणी, अन्न आणि उर्जा आणि या परिस्थितीला हे जग फेस करू शकेल ह्या बद्दल संस्थेला शंकाच आहे. आज जगात वाढत्या गती ने होणारे शहरीकरण, शेती, कारखाने आणि त्याच बरोबर वाढती शुद्ध पाण्याची मागणी इतकी वाढली आहे की सन २०३० पर्यंत याची उपलब्धता कमी होणार आणि याचा थेट परिणाम आर्थिक उन्नती, लोकांचे स्वास्थ्य आणि राजनितीक स्थिरतेवर होणार हे संस्थेचे भाकीत आहे व त्या करिता सर्कल ऑफ ब्लू आणि त्यांच्या सहयोगी संस्था यांनी मिळून सगळ्या प्रकारचा डाटा उपलब्ध करणारी एक ऑपरेटिव्ह सिस्टम तैयार केली व त्याची माहिती सगळ्यांना फुकट उपलब्ध करून देतात .

अमेरीके बद्दल बोलायचे तर त्यांच्या कडे हॅड्रोपॉवर ची इतकी फॅसिलीटी आहे कि ते एक- चतुथार्ंश घरांना वीज पुरवठा करू शकेल आणि ही वीज निर्मिती ५०० बॅरल ऑइल किंवा १०० कोल पॉवर प्लांटच्या बरोबर असेल. पण बदलत्या वायुमानामुळे त्याचे पाण्याचे साठे सुकत चालले आहे आणि पाण्याचा रन ऑफ पॅटर्न बदलल्या मुळे पाण्याचा प्रवाहाचा अंदाज पण घेता येत नसल्या मुळे धरण बांधणे आणि वीज निर्मित करणे कठीण झाले आहे.

अमेरीकेतील सगळ्यात मोठ्या मेड जालाशयाबद्दल बोलायचे तर, ५० टक्के असा अंदाज आहे की सन २०१७ पर्यंत, तो हॅड्रोपॉवर जनरेट करण्याच्या स्थितीत राहणार नाही आणि सन २०२१ पर्यंत पूर्णपणे आटलेल्या स्थितीत असेल असे Scripps Institution of Oceanography चा अंदाज आहे.

या पृथ्वीवर नद्या , तलाव किंवा झरे यांच्या पाण्याच्या साठ्या पेक्षा २५ पटीने जास्त हा भूजलाचा साठा आहे व त्यावर २ बिलियन लोकं , पिण्याच्या पाण्या करिता अवलंबून राहू शकतात, पण यातले निम्मे पाणी हे शेती करिता वापरण्यात येते. चीन आणि भारत हे ग्रेन बेल्ट असल्या कारणाने अति भूजलाचा वापर शेती करिता होत असल्या कारणाने भूजलाची पातळी ढासळत चाललेली आहे असे सर्कल ऑफ ब्लू चा रिपोर्ट आहे.

सन २०१५ मधे सर्कल ऑफ ब्लू आणि विल्सन सेंटर ने भारताच्या पंजाब राज्यात अन्न , पाणी, आणि उर्जा बद्दल होत चाललेले विवाद आणि त्याचे देशभर उमटलेले पडसाद व त्याची कारणे दाखवायचा प्रतत्न केला व लिहिले होते की, पंजाबच्या शेतकर्‍यांना फुकट पाणी आणि वीज दिल्याने उत्पन्न तर भरपूर मिळाले पण त्यामुळे अति मात्रेत भूजल साठा रिकामा झाला. कितीतरी दशलक्ष युनीट वीज वाया गेली व धान्य पण इतके झाले की आत ठेवायला जागा नसल्या मुळे ते बाहेर असे सडत ठेवावे लागले. पंजाब बद्दल तर त्यांनी water wasting agriculture in Punjab असे मत व्यक्त केले आहे.

त्यांचे असेही मत आहे की भारत हा कोळशाच्या बाबतीत एक श्रीमंत देश आहे पण त्याला त्या साठ्याचा योग्य उपयोग करता आला नाही. कोळसा आहे तर, वीज निर्मिती करायला पाणी नाही.

सन २०१३ साली उत्तराखंड मधील विनाशकारी प्रलय आला त्यात नवीन आणि जुने हायड्रो पावर याचे भयंकर नुकसान झाले, जे बरेच वर्षा पासून अपेक्षित होते पण मुद्दाम त्याच्या कडे दुर्लक्ष करण्यात आले असे संस्थेचे मत आहे . ह्या हायड्रो पावर स्टेशन ची निर्मिती, पंजाबच्या शेतकर्‍यांना फुकट वीज दिल्या मुळे निर्माण झालेली कमी भरून काढण्या करिता करण्यात आली असे सर्कल ऑफ ब्लू चे रिपोर्टिंग आहे.

मागील वर्षाचा दुष्काळ आणी कमी पर्जन्यमाना मुळे शेती वर परिणाम तर झालाच त्याच बरोबर हायड्रोपावर च्या निर्मिती वर पण झाला. भूजलाच्या अत्याधिक उपसा मुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर दीर्घ परिणाम होतो आणि गावाकडील लोकं आधीच गजबजलेल्या शहरां कडे कूच करतात.

भारता बद्दल सर्कल ऑफ ब्लू ने वेगवेगळे विषय धरून रिपोर्टिंग केले आहे, जसे, उत्तरे कडील हायड्रोपावर प्लांट, नैसर्गिक स्त्रोतांना बळ कसे द्यायचे व त्याचे प्रबंध , दुषित गंगे समोर पुन्हाः मां गंगेला स्वच्छ करायच्या गोष्टी, मेघालयातील कोळसा खदानीवर NGT ने घातलेली बंदी , सन २०१३ मधील उत्तराखंडा तील आपदा तिथल्या हायड्रोपावर मुळे अजून भयानक झाली असे सर्कल ऑफ ब्लू चे मत आहे. भारतातील असे इतर अनेक विषय धरून सर्कल ऑफ ब्लू ने रिपोर्टिंग केले आहे आणि करीत आहे.

Choke point : India म्हणजे भारताचा दम कुठे घुटतो किंवा कुठे दाटतो या वर संस्थेने खालील गोष्टींचा चा उल्लेख केला आहे.

- कृषी उद्योग हा ७०० मिलियन लोकांना सपोर्ट करतो.
- जनसंख्येच्या बाबतीत जगात दुसर्‍या क्रमांकावर - सन २०१३ च्या, २.१३ मिलियन या जनसंख्येच्या आकड्यांनी भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे व तो २०२५ पर्यंत चीन च्या पुढे जाईल .
- अन्न धान्याच्या उत्पन्ना मध्ये तिसर्‍या क्रमांकावर - फुकट पाणी आणि फुकट वीज हे शेतकर्‍यांना दिल्यामुळे तांदूळाच्या उत्पन्नात गरजे पेक्षा ६२ मिलियन टनाची वाढ झाली व ती मागच्या वर्षाच्या उत्पन्नाच्या ६०टक्के जास्त आहे. भारताच्या गोदामात २५ मिलियन टन तांदूळ पडून आहे.
- शुद्ध पाण्याच्या साठ्याचा जर विचार केला तर भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे.

संस्थेच्या मता प्रमाणे भारतात प्राकृतिक साधन संपत्तीची किंवा स्त्रोत याची कमी नसून , त्यांची अपूर्ण उपयोगिता व बाबूशाही हे आहे .

पॅसिफिक इंस्टीट्युट ने सर्कल ऑफ ब्लू च्या सहायाने सन २००७ पासून जागतिक स्थरावर पाण्याच्या समस्येला दूर करण्या करिता वचनबद्ध आहे. विकास कामात अडथळे जसे जनसंख्या, हवामान बदल आणि स्त्रोत या विषयांवर ही, ही संस्था विचार करणार आहे. ह्या प्रोजेक्ट ची सुरवात सर्कल ऑफ ब्लू ने सन २००७ मध्ये केली व त्याला लागणारा अवधी जवळपास अकरा वर्षांचा असेल, व येणारा खर्च पण अंदाजे ३५०००००० अमेरिकन डॉलर असेल असे संस्थे चे भाकीत आहे.

या प्रोजेक्ट अंतर्गत येणारे प्रदेश म्हणजे नॉर्थ अमेरिका, एशिया, मिडल इस्ट आणि नॉर्थ आफ्रिका, लॅटिन अमेरिका व कॅरिबीयन असे असतील.

आणि देशाचं म्हणाव तर कॅनडा, चीन, भारत, जॉर्डन, मेक्सिको, मोंगोलिया, कतार, साउथ आफ्रिका आणि अमेरिका.

सर्कल ऑफ ब्लू च्या या वचनबद्धतेत मदत करणार्‍या संस्था असतील, Evergreen Exhibitions, 2) Woodrow Wilson International Center for Scholars, 3) Sustainability, 4) Sea Studios Foundation आणि ५) Great Lakes Water Studies Institute.

पाण्या बद्दल खाली दिलेले काही मुद्दे माहित असणे, हे , असे सर्कल ऑफ ब्लू चे मत आहे.

१.भूजल साठा हा , नदी, तलाव व झर्‍यांपेक्षा २५ पटीने जास्त असतो.
२.जगातील ४२ टक्के भूजल हा शेती करिता वापरल्या जाते.
३. US पेक्षा कॅलिफोर्निया, भूजलाचा उपसा जास्त करतो. जवळ जवळ १२.३ बिलियन गॅलन पर डे.
४.१.५ ते ३.० बिलियन लोकांकरिता भूजल हा मुख्य स्त्रोत असतो.
५.भूजलाने शेती सिंचन करण्यात भारत हा कोणत्याही देशा पेक्षा पुढे आहे. जवळ जवळ ३९ मिलियन हेक्टर.
६.कॅलिफोर्नियाच्या दुष्काळा दरम्यान अधिक भूजलाचा उपशामुळे तिथल्या सेन्ट्रल व्हॅली चा काही भाग ५ Cm प्रती माह च्या गतीने धसत आहे.
७.जगातील ३७ पैकी २१ भूजलाचे मोठे साठे आटले आहे.
८.भूजलाची पातळी आटल्या मुळे सौदी अरेबिया ने सन २०१६ पासून, आपले गव्हाचे पिक घेणे बंद केले आहे.
९.भूजल उपशामधे भारत हा कुठल्याही देशा पेक्षा पुढे आहे व तो चीन च्या उपशापेक्षा दुपटीने जास्त आहे. इत्यादी इत्यादी

कुठलीही संस्था चालवायची म्हणजे भांडवल लागत आणि त्या करिता ही संस्था शासकीय अनुदान, दुसर्‍या संस्था, आणि वैयक्तिक डोनेशन च्या भरवश्या वर चालते व सर्कल ऑफ ब्लू ला दिलेल डोनेशन हे टॅक्स फ्री असत .

ग. Carl Ganter हे या संस्थे चे को-फाउनडर आणि डायरेक्टर असून त्यांचा पत्ता आहे :

सर्कल ऑफ ब्लू १२०० वेस्ट ११ व्या स्ट्रीट ट्रॅव्हर्स सिटी, एमआय ४९६८४ यूएसएफोन +१ २३१-९४१-१३५५

श्री. विनोद हांडे, नागपूर - मो : ९४२३६७७७९५

SCROLL FOR NEXT